अमरावती :- स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचे मुख्य औषध निर्माण अधिकारी सतीश माहुरे व सौ अरुणा माहुरे यांचा मुलगा पियुष याने मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले असून ८८.२०%
मार्क्स प्राप्त केले आहे.आपल्या या यशाचे श्रेय तो मणिबाई गुजराती हाय स्कुल च्या प्राचार्या देव मॅडम व सर्व शिक्षक वर्ग,तसेच कोचिंग क्लासेस चे संचालक श्री बोरखडे सर व सर्व शिक्षक वर्ग तसेच आपल्या आई वडिलांना देतो
त्याच्या या यशाबद्द्ल बोरखडे कोचिंग क्लासेस तर्फे २८/०५/२०२४ रोजी आयोजित सत्कार सोहळ्यात सत्कार करण्यात आला यावेळी सर्व शिक्षक,मित्रपरिवार व आप्तेष्ट यांनी पियुष चे अभिनंदन करून शुभेच्छा चा वर्षाव केला.