नेरपिंगळाई येथिल शिक्षक सुनील डेहणकर यांनी वृक्षारोपण करून केला वाढदिवस साजरा
(मोर्शी) प्रतिनिधी प्रमोद घाटे/प्रविण पाचघरे. नेरपिंगळाई येथिल जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सुनील डेहणकर यांनी सामाजिक जाणीव जोपासत जिल्हा परिषद शाळेतील प्रांगणात दोण वृक्ष लागवड करुन लावलेल्या वृक्षांचे संगोपन व्हावे यासाठी पाण्याची विशेष व्यवस्था करून जील्हा परीषद शाळेचे मुख्याध्यापक विजय खंडारकर शिक्षक, व विद्यार्थी यांच्या समवेत भर उन्हात वृक्षारोपण करून सर्वांना वृक्षलागवळिचे महत्व समजावून सांगितले वृक्षलागवड करणे हि काळाची गरज आहे.व प्रत्येकांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी कमीत कमी एक वृक्ष लावून त्या वृक्षांचे संगोपन करावे .