तालुकाध्यक्षपदी राजीव शिवणकर, उपाध्यक्षपदी प्रशांत सिसोदीया तर सचिवपदी राहूल देशमुख यांची निवड
चांदूर रेल्वे - अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, चांदूर रेल्वे तालुका शाखेच्या अध्यक्षपदी राजीव शिवणकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. तर तालुका उपाध्यक्षपदी प्रशांत सिसोदीया व सचिवपदी राहूल देशमुख यांची निवड झाली आहे.
अ. भा. ग्रा. पत्रकार संघाची बैठक शुक्रवारी सायंकाळी चांदूर रेल्वे शहरात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान होते. या बैठकीत मान्यवरांनी उपस्थित पत्रकार बांधवांना मार्गदर्शन केले. तसेच या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाल्यानंतर अ. भा. ग्रा. पत्रकार संघ, चांदूर रेल्वेच्या शाखेची सन २०२४ - २५ करिता नवीन कार्यकारिणी सर्वानुमते घोषित करण्यात आली. यामध्ये तालुकाध्यक्षपदावर राजीव शिवणकर, उपाध्यक्षपदी प्रशांत सिसोदीया, सचिवपदी राहूल देशमुख, सहसचिवपदी संजय डगवार व कोषाध्यक्षपदी विनय गोटेफोडे यांची वर्णी लागली आहे. तर तालुका सदस्यांमध्ये युसूफ खान, उत्तमराव गावंडे, प्रा. रवींद्र मेंढे, बाळासाहेब सोरगिवकर, अमोल गवळी, इरफान पठाण, धीरज नेवारे, शहजाद खान, मनिष खुने यांचा समावेश आहे. या बैठकीचे संचालन बाळासाहेब सोरगिवकर तर प्रास्ताविक प्रा. रवींद्र मेंढे यांनी केले. निवड झालेल्या नवीन कार्यकारीणीवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.