विश्व बंधुता साहित्य परिषद व काषाय प्रकाशन ,पुणे तर्फे विविध पुरस्काराची घोषणा झाली असून त्यात अमरावतीचे गझलकार,चित्रकार व सामाजिक कार्यकर्ते देवीलाल रौराळे यांना बंधुता काव्य प्रतिभा पुरस्कार जाहीर झाला आहे.
दिनांक २ जून २०२४ ला श्रमिक पत्रकार भवन,गांजवे चौक,नवी पेठ, पुणे येथे संपन्न होत असलेल्या विश्व बंधुता दिन व ऐतिहासिक पहिल्या विश्व बंधुता काव्य महोत्सवात त्यांना हा परस्कार दिल्या जाईल.देवीलाल रौराळे हे अरावतीचे आठपैलू व्यक्तित्व असून गझलकार सोबतच ते व्यवसायाने चित्रकार आहेत.ते राईट वे फाऊंडेशन चे अध्यक्ष असून त्या माध्यमातून ते सामाजिक ,साहित्यिक व व्यसनमुक्ती वर सतत काम करीत असतात.आजवर ते बऱ्याच पुरस्काराने सन्मानित झाले असून २०२४ या नवा वर्षातील हा त्यांचा चौथा पुरस्कार आहे.त्यात शब्द क्रांती साहित्य पुरस्कार,पुणे, अमरावती भूषण पुरस्कार, अमरावती, कलारत्न पुरस्कार, अमरावती व काव्य प्रतिभा पुरस्कार, पुणे इत्यादींचा समावेश आहे.
त्यांच्या या सन्मानाबद्दल समाजातील विविध क्षेत्रातून शुभेच्छाचा वर्षाव होत असून राईट वे फाऊंडेशनचे जेष्ठ नेते प्रविण देसमुख,काका कुंभलवार,प्रल्हाद राव मेश्राम,
कुंदन शेंडे,राजेंद्र मेश्राम, सतीश गवई,वसंत ठवरे , माजी नगरसेवक सुरेश मेश्राम, रिपाई जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश बनसोड, शहराध्यक्ष मनोहर घोडेस्वार,आकाशवाणीचे संजय वाघुळे, तथागत टीव्ही चे संचालक अरुण वानखडे, सचिन वैद्य, बाल्या देशमुख,मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष सचिन ढगे,विद्यार्थी नेते गौतम वाणखडे सह मित्र मंडळींनी त्यांचे कौतुक केले आहे.