उदगीर : नरसामाता उच्च माध्यमिक आश्रमशाळा नावंदी ता.उदगीर १२ वी परीक्षेचा विज्ञान व कला शाखेचा १०० टक्के निकाल लागला आहे.
बारावी विज्ञान शाखेतून प्रथम पिंगळे कांदबरी सतिश ८५.१७ टक्के, व्दितीय कांडगिरे अंकिता माधव ८५ टक्के, सर्व प्रथम निलेवार हरिदास रमेश ६९.८३ टक्के, द्वितीय आव्हाड सुदामा रामप्रसाद ६९.६७ टक्के एकूण परीक्षेसाठी प्रविष्ट विद्यार्थी १४३ त्यापैकी उत्तीर्ण विद्यार्थी १४३ उत्तीर्ण शेकडा निकालाची टक्केवारी १०० टक्के असून विशेष प्राविण्य ३० प्रथम श्रेणी, ९५ द्वितीय श्रेणी, १६
उत्तीर्ण ०१, खाजगी विद्यार्थी ०१,
सर्व प्रथम पिंगळे कांदबरी सतीश, सर्व द्वितीय कांडगीरे अंकीता माधव,
१२ वी कला शाखा एकूण परीक्षेसाठी प्रविष्ट विद्यार्थी ५६, त्यापैकी उत्तीर्ण विद्यार्थी ५३,
शेकडा निकालाची टक्केवारी ९४:६४ प्रथम श्रेणी २२, द्वितीय श्रेणी २९,
उत्तीर्ण ०२, सर्व प्रथम निलेवार हरिदास रमेश, सर्व द्वितीय आव्हाड सुदामा रामप्रसाद वरील सर्व उत्तीर्ण विद्यार्थी, विद्यार्थिनीचे संस्थाध्यक्ष व्ही.जी.कांडगीरे, उपाध्यक्ष ए.व्ही.कांडगीरे, प्राचार्य एस.व्ही.पुल्ले, प्रा.सौ.कवडेकर जे. बी., प्रा.चव्हाण व्हि.एम., प्रा.बिरादार एम.एन., प्रा.सौ.आचार्य एस.बी., प्रा. परगे एस.बी., प्रा.रेड्डी ए.टी. यांनी अभिनंदन करुन कौतुक केले.विशेष म्हणजे केंद्रात प्रथम आलेली कादंबरी सतीश पिंगळे ही मुलगी काबाडकष्ट, मेहनतीने, जिद्दीने व स्वबळावर आपल्या बुद्धिमत्तेच्या ज्ञानाच्या गरीब परिस्थिती मधून मात करीत सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला. याबद्दल कादंबरी सतीश पिंगळे हिचे गुडसूर, ता.उदगीर गावातही खूप मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. व तिच्या या गरिबीतून मेहनतीवर उत्तीर्ण झाल्याबद्दल तिचे अभिनंदन होत आहे.