पनवेल(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)-पत्रकार उत्कर्ष समिती या राज्यस्तरीय अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समिती यांनी संयुक्तपणे मोफत आयोजित केलेल्या गर्भाशय मुखाचा कॅन्सर या रोगाविषयी जनमानसात माहिती व्हावी यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.पत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष डाॅ.अशोक म्हात्रे यांनी उपस्थिती महिला भगिनींना रोगाविषयी प्राथमिक माहिती दिली.महिला उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्षा डाॅ.स्मिता पाटील यांनी गर्भाशय मुखाचा कॅन्सर या आजाराविषयी सांगताना या रोगाची कारणे,लक्षणे व काळजी याविषयी अधिक माहिती दिली.
मॅग्नस हाॅस्पिटल उलवे च्या संचालिका प्रमुख स्री रोगतज्ञ डाॅ.अश्विनी देशमुख यांनी उपस्थित ॠग्णांची तपासणी केली तसेच त्यांचे मानसिक प्रबोधन केले.यावेळी Pap smear,HPV DNA testing,HbsAg,and HBV DNA testing या चाचण्या मोफत केल्या असुन भविष्यात अशा आजाराची काही लक्षणे आढळल्यास त्यावरील उपचार याबाबत पत्रकार उत्कर्ष समिती सहकार्य करणार असल्याचे अध्यक्ष डाॅ.अशोक म्हात्रे यांनी सांगितले.या कार्यक्रमासाठी गव्हाण ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी श्री.राठोड,सरपंच सौ.माई भोईर,सदस्य सौ.उषा देशमुख,सदस्या सौ.कामिनी कोळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमासाठी पत्रकार उत्कर्ष समितीचे सचिव डाॅ.वैभव पाटील,सदस्य ज्ञानेश्वर कोळी,खजिनदार शैलेश ठाकुर,महिला उत्कर्ष समितीच्या उपाध्यक्षा सौ.आरती पाटील,महाराष्ट्र सचिव ऍडव्होकेट दिव्या लोकरे,नवी मुंबई कार्याध्यक्षा सौ.वर्षा लोकरे यांच्यासह इतर सदस्य हजर होत्या.या कार्यक्रमासाठी डी.वाय.पाटील काॅलेजच्या सस्कूल ऑफ पब्लिक हेल्थ विभागाच्या नीदा बानो रिसर्च(Associate),स्वाती बागल शिर्के(लॅब टेक्निशियन)यांनी महत्वाची भूमिका निभावली.यावेळी विभागातील साधारणतः५०महिला भगिनींनी या शिबिराचा लाभ घेतला.