उपजिल्हा रूग्णालय वरोरा येथे जागतिक उच्च रक्तदाब दिवस साजरा

 


      


वरोरा : दिनांक १७ मे २०२४ ला जागतिक उच्च रक्तदाब दिवस साजरा करण्यात आला.व्यासपिठावर डॉ प्रतिक दारुंडे वैद्यकीय अधिकारी, वंदना विनोद बरडे अधीसेवीका व डॉ केशवानी उपस्थित होते.मान्यवरांनी दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.प्रास्ताविक वंदना विनोद बरडे अधीसेवीका यांनी केले.आजकाल जिवन शैली बदलली आहे.

     त्यामुळे आरोग्यावर बरेच वाईट परिणाम होत आहे. त्यापैकीच एक उच्च रक्तदाब हा आहे.जिवनशैलीचा परिणाम संपूर्ण शरिरावर होऊन अनेक आजारांना आमंत्रण दिले जात आहे. म्हणून सकारात्मक विचार व जिवन शैली चा अंगीकार केला तर बरेच रोगांवर नियंत्रण मिळवता येते.त्याद्रुष्टीने प्रयत्न करणे जरुरीचे आहे. तसेच योगा प्राणायाम मेडिटेशन व्यायाम करणे आवश्यक आहे.

     कमी मीठाचे,कमी साखरेचे पदार्थाचा वापर करणे.मसालेदार तेलकट,तूफकट पदार्थ टाळणे.जंकफुड टाळावेत.डाॅ दारूंडे यांनी मार्गदर्शन केले.

     लक्षणें उपचार यांची माहिती दिली.सूत्रसंचालन नेहा ईंदूरकर एनसिडि कौन्सिलर,व आभारप्रदर्शन किरणं धांडे ए एन एम शीष्टर यांनी केले.कार्यक्रमात मेहनत तणिष्का खडसाने लाॅब टेक्निशियन व व्रुशाली दहेकर अप,कूंदा मडावी यांनी घेतली.

Post a Comment

Previous Post Next Post