किनवट आदिवासी दुर्गम तालुक्यात मोबाइल मेडिकल युनिट चालू करण्याची मागणी...!बबन वानखेडे पाटील यांची मागणी
किनवट, विशेष प्रतिनिधी/अनिल बंगाळे -: आदिवासी नक्षलग्रस्त तालुक्यातील अनेक गाव, पाडे, तांडे, वांड्यापर्यंत अद्याप शासनाची आरोग्य सेवा पोहोचलेली नसल्याचे निदर्शनास आले असून त्यानुसार अनरिच टू रिच या संकल्पनेचा आधार घेत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत मोबाइल मेडिकल युनिट सुरू करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते बबन वानखेडे यांनी केली आहे. मोबाइल मेडिकल युनिट मुळे रुग्णांवर प्रत्यक्ष जागेवर जाऊन मोफत औषधोपचार केले.
मेडिकल युनिटअंतर्गत करण्यात येते. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी ग्रामीण अथवा जिल्हा रुग्णालयात रुग्णास पाठविण्याबाबतचे मार्गदर्शन हे डॉक्टर करतील. शासकीय व सण-उत्सवांच्या सुट्या वगळता साधारणतः २०-२२ दिवस ही सेवा दिली जाते. याद्वारे महिनाभरात दीड ते दोन हजार रुग्णांवर मोफत उपचार करणे शक्य होऊन उपजिल्हा रुग्णालयावर येणारा अतिरिक्त ताण कमी करण्यास मदत होईल.