गुजरात मधील संत रोहिदास वाडियार चर्मकार समाजाचा उत्तर मुंबईत महाविकास आघाडीला पाठिंबा

 






मुंबई : भारत जोडो अभियान - निर्धार महाराष्ट्र हा जबाबदार नागरिकांचा तसेच संविधान व लोकशाही संरक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या संस्था संघटनाचा मंच आहे. येत्या 20 मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत लोकशाही विरोधी, संविधान विरोधी भाजपा मित्र पक्षाच्या शक्तीला पराभूत करुन महाविकास आघाडीच्या उमेदवारास मतदान करण्यासाठी समाजातील विविध जाती धर्मातील व वर्गातील घटकांना प्रोत्साहित कारण्याचे कार्य भारत जोडो अभियान करते आहे. भारत जोडो अभियानाच्या या कार्यास जनतेतून खूप पाठिंबा मिळत आहे, त्यात आज मुंबई स्थीत गुजरात मधील संत रोहिदास वाडियार चर्मकार समाजाने भारत जोडो अभियानास पाठिंबा पाठिंबा जाहीर केला आहे, संत रोहिदास वाडियार चर्मकार समाजाचे चारकोप चे अनेक पदाधिकारी यांनी नुकतीच उत्तर मुंबईतील भारत जोडो अभियानाच्या बैठकीत उपस्थिती दर्शवली व बैठकीनंतर यांनी सांगितले की, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या संविधानामुळे आम्हाला आज समानता दिसत होती आमची मुलं प्रगती करत होती ते संविधान संपविण्याचे काम भाजपा सरकार करत आहे त्यामुळे संविधान वाचविण्यासाठी आम्ही भारत जोडो अभियानासोबत आहोत, तसेच यासाठीच भाजपा व महायुतीला विरोध करत महाविकास आघाडीच्या उमेदवारास आम्ही संत रोहिदास वाडियार चर्मकार समाजामार्फत मतदान करण्याचे जाहीर करतो."

यासाठी भारत जोडो अभियानाचे उत्तर मुंबई समन्वयक आशुतोष शिर्के, प्रमोद शिंदे, किरण जाधव, मिलिंद शिर्के व घनश्याम देटके यांनी त्यांचे आभार मानले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post