दिनांक २८ एप्रिल २०२४ ला झालेल्या शानदार सोहळ्यात वंदना विनोद बरडे अधीसेवीका व सामाजिक ह्यांना सुधा चंद्रन सुप्रसिद्ध अभिनेत्री यांच्या हस्ते राष्ट्रीय प्रतीभा सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले.
त्यांना त्यांच्या गेल्या २८ वर्षाच्या सेवावृत्तीचे व सेवाभाव सेवाकार्याचा आणि सामाजिक कार्याला पुरस्कार देण्यात आला.सोबतच अवयव दान,नेत्र दान,देह दान, रक्त दान,आणि आरोग्य सेवेतिल जेही कार्य अगदी तत्परतेने करतात तसेच आरोग्य सेवेत सर्व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, जागतिक स्तरावरील कार्यक्रमांत हिरारिने भाग घेवुन त्याचा प्रचार व प्रसार करतात.जन समुदयाला आव्हान पण करतात.म्हणून स्पाॅरो या जागतिक स्तरावरील कार्यक्रमांत त्यांचा राष्ट्रीय प्रतीभा सन्मान देवून सत्कार करण्यात आला.व हा पुरस्कार देण्यात आला.सर्व स्तरांतून त्यांचा कार्याचा,गुणांचा,गौरवांचे कौतुक केले जात आहे.