दारिद्र्याच्या पराकोटी जगतोय भोई समाज;नदीपात्रात जाते त्याचा आयुष्य..! एस टी. एस सी च्या सवलती मिळणार कधी
धामणगाव प्रतिनिधी अजय डाखोरे
प्रामाणिकपणे गरीब मासे पकडण्याचे काम करणारा भोई समाज दारिद्र्य दारिद्र्यात पराकोटी च्या जगत आहे.
नदीच्या पात्रात मासे पकडण्यासाठी संपूर्ण आयुष्य जात असताना उद्याच्या पिढीला अनुसूचित जाती जमातीची सवलत मिळणार कधी असा प्रश्न या समाज बांधवांनी व गजानन मेश्राम यांनी उपस्थित केला आहे.
बारा बलुतेदार नंतर 18 आलू ते दारातील महत्त्वाचा घटक म्हणजे भोई समाज आहे या समाजाला इतिहास हा मोठा आहे.
पूर्वीच्या काळी मंदिर राजवाड्यामध्ये पालखी वाहून नेण्याचा मान भोई समाजाला होता आजही अनेक राज्यात मंदिरातील पालखीचा मान हा भुई बांधवांनाच मिळाल्याशिवाय पालखी समोर जात नाही. वेदकाळ रामायण महाभारतातील काळ मध्ययुगात चा काळ शिवकाळा प्रमाणे स्वतंत्र पूर्व काळात लोक उपयोगी समाज म्हणून यांच्याकडे पाहिले जात होते भोई जमा संस्कृती दृष्ट्या आदिवासी असल्याचे संरक्षणात आढळून आले आहे.
त्यांना ओडीसा ,बिहार ,उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश राज्यात अनुसूचित जातीचा जातीत सवलत मिळत आहे. तर महाराष्ट्रात नोकरी शिक्षण क्षेत्रात टिकावांना लागल्याने विमुक्त भटक्या जातीच्या सवलतीत दिल्या जातात 1947 नंतर भटक्या विमुक्त जातीच्या सवलती भोई समाजात मिळालेल्या हे जेवढे सत्य आहे तेवढेच या सवलतीत लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलाच नाही ही बाब सुद्धा तेवढी सत्य आहे.
पारंपारिक व्यवसाय संकटात भोई समाजाचा मासेमारीचा पारंपरिक व्यवसाय आता संकटात आला आहे. कमी पर्जन मामा मुळे नदी नाले तलावाच्या पाण्याची पातळी पूर्णता घटली आहे अनेक तलाव कोरडे पडलेले आहे आणि जाळे विनायचे काम बंद झालेले आहे यामुळे बेरोजगारीची संख्या वाढलेली आहे.