देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा

 




 प्रतिनिधी अजय डाखोरे


वर्धा लोकसभा मतदार संघाचे भाजप महायुतीचे उमेदवार रामदास तळस यांच्या प्रचारात महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य जाहीर सभा मंगळवारी दिनांक 23 एप्रिल 2024 दुपारी एक वाजून 30 मिनिटांनी जिल्हा परिषद शाळेच्या प्रणांगणात चांदुर रेल्वे येथे संपन्न झाली.

 यावेळी मंचावर वर्धा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रामदास तळस तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धामणगाव मतदार संघाचे आमदार प्रताप अडसळ तीनही तालुक्याचे नांदगाव खंडेश्वर धामणगाव रेल्वे चांदुर रेल्वे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष व पद अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 यावेळी आकर्षण भाषण जे ठरले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते आपल्या भाषणात म्हणाले "शरद पवारच्या इंजिनला डब्बा नाही आणि त्या डब्यात बसायला अजित दादाला जागा नाही" फक्त सुप्रिया सुळे बसू शकतात तसेच उद्धव ठाकरे यांच्या इंजन ला सुद्धा डब्बा नाही आणि त्या डब्यात शिंदे बसू शकत नाही फक्त आदित्यच बसू शकतात यांचे इंजन फक्त पूर्वेला जाते तर कधी दक्षिणेला जाते आणि नंतर थकून जाते पण आमचं इंजन असा आहे.

आमच्या इंजनात विकास पुरुष मान्य नरेंद्र मोदी हे या इंजनाला डब्बा जर लावला त्यात जर रामदास तळत बसले तर वर्धा लोक मतदार संघाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी आपल्या भाषणात जनता जनार्दन ला सांगितले अनेक मुद्द्याला त्यांनी हात घालून लांबलचक विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी आपले भाषण दिले.

 त्यानंतर कार्यक्रम चे आभार प्रदर्शन तालुका अध्यक्ष धामणगाव रेल्वे मनोज डहाके यांनी केले..

Post a Comment

Previous Post Next Post