मुंबई (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)
शनिवार दिनांक 20 एप्रिल रोजी सायंकाळी सुरेंद्रे गावस्कर सभागृह, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, दादर येथे..
आर्यारवी एंटरटेनमेंटच्या दुसऱ्या वर्धापन दिना निमित्त राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला होता.या पुरस्कार सोहळ्याच्या वेळी सिने-नाट्य क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.
सुरेखा गावंडे दिग्दर्शित
**ऑक्सिजन फॉर लाईफ **
या लघुपटाला *प्रबोधनात्मक लघुपट तसेच चित्रपटातील मुख्य नायिका सुषमा सिनलकर यांना उत्कृष्ट अभिनेत्री असे दोन पुरस्कार मिळाले.रोख 2,000/(दोन हजार रुपये) आणि ट्रॉफी देऊन दिग्दर्शिका सुरेखा गावंडे आणि आणि अभिनेत्री सुषमा सिनलकर यांना सन्मानित करण्यात आले.
या वेळी मंचावर प्रसिद्ध विनोदी अभिनेते विजय पाटकर,कुटुंब रंगलंय काव्यात फेमस प्राध्यापक विसूभाऊ बापट, जेष्ठ कवी अरुण म्हात्रे, दैनिक नवे शहरचे उपसंपादक राजेंद्र घरत, प्रसिद्ध अभिनेत्री सिद्धी कामथ, जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर, लेखक, दिग्दर्शक अनंत सुतार आणि समाजसेवक एन. डी. खान आदी मान्यवर उपस्थित होते.सदर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन अभिनेते, दिग्दर्शक महेश्वर तेटांबे यांनी केले होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विलास (बाळा) चौकेकर यांनी अगदी खुमासदार पद्धतीने केले.
सुरेखा गावंडे या जेष्ठ कवयित्री, गीतकार, लेखिका आहेत. त्यांची आठ पुस्तके प्रकाशित आहेत. मराठी चित्रपट असोसिएशनच्या त्या संचालिका आहेत.