गुढीपाडवा लॉटरी ६५ टक्के विक्री

 



राज्य लॉटरीचा वर्धापनदिन दिमाखात साजरा


मुंबई(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)

 महाराष्ट्र राज्याच्या भव्यतम गुढीपाडवा बंपर लॉटरीची वैभवशाली सोडत आणि सोबत राज्य लॉटरीचा ५५वा वर्धापनदिन सोहळा मंत्रालयात आयुक्तांच्या दालनात आणि वाशी येथील लॉटरी कार्यालयात दिमाखात साजरा करण्यात आला.


यंदाच्या गुढीपाडवा सोडतीची 

 विक्री ६५ टक्के झाली असून येत्या वर्षात शंभर टक्के विक्री करण्याचे आवाहन लॉटरी विक्रेत्यांचे जेष्ठ नेते श्री विलास सातार्डेकर यांनी विक्रेते, वितरक यांना केले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षांत लॉटरी विक्रीत वाढ होत असून ग्राहक दिवसेंदिवस आकर्षित होत आहेत एक विश्वासहार्य व पारदर्शक लॉटरी म्हणुन महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर लवकरच विक्रमी विक्रीतून यापुढे सिद्ध होईल, अशी आशाही सातार्डेकर यांनी या निमित्ताने व्यक्त केली. 

मंत्रालयात लॉटरी आयुक्तांच्या दालनात झालेल्या वर्धापन दिन सोहळ्यात सर्वश्री लॉटरी आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, अवर सचिव स्वाती विचारे, कक्ष अधिकारी शिला यादव व ईतर कर्मचारी उपस्थित होते तर वाशी येथील लॉटरी कार्यालयात सोडतीच्या कार्यक्रमात उपसंचालक विद्याधर जोशी, संदेश ओहाळ, कक्ष अधिकारी शरद सोनावणे, सो. खाडे मॅडम व ईतर कर्मचारी तसेच अनेक शुभेच्छुक उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता सेनेचे संस्थापक अध्यक्ष विलास सातार्डेकर यांनी राज्य लॉटरीच्या वर्धापन दिन सोहळ्यास शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post