जिल्हा प्रतिनिधी सादिक शेख
सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याची जयंती उत्साहात साजरी
करण्यात आली. जयंती निमित्त उत्सव समितीच्या वतीने येथे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास राज्याचे पणन व अल्पसंख्यांक विकास मंत्री ना. अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. या मिरवणुकीमध्ये विद्यार्थ्यांनी भीम गीते गाऊन नृत्य सादर केले. प्रारंभी ना.अब्दुल सत्तार यांच्याहस्ते येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.ना.अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे डॉक्टर संजय जामकर गोपीचंद जाधव यांच्यासह विजय तायडे, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र बावस्कर श्रावण भाऊ भीमराव,बोराडे उप संरपच फिरोज पठाण, दीपक आगळे.राहुल दामोदर, जाकेर शेख,शे सत्तार शे मुन्शी,अजीज खा पठाण,विकी शिंदे आदिंसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी , सदस्य , गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.