डोंबिवली(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)
डोंबिवली - नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त श्री गणेश मंदिर संस्था आणि कल्याण येथील सुभेदारवाडा कट्ट्यातर्फे छायाचित्र, स्वयं प्रतीमा (सेल्फी) आणि चित्रफित स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्वागत यात्रेसंबंधीची छायाचित्रे, चित्रफिती स्पर्धकांनी दिलेल्या साधनावर पाठविणे आवश्यक आहे, असे संयोजकांनी सांगितले.
स्वागत यात्रेसोबत तयार केलेली वैशिष्टपूर्ण चित्रफित (रील), स्वागत यात्रेमध्ये स्वयं प्रतीमेचे काढलेली छायाचित्रे, दीपोत्सव अशी विविध प्रकारची छायाचित्र व ३० ते ६० सेकंदाची चित्रफित स्पर्धेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत, असे संयोजक श्रीपाद कुळकर्णी यांनी सांगितले. छायाचित्रे *dombivlisy24 photocontest@gmail.com* पाठवावीत. स्वागत यात्रेतील ही छायाचित्रे स्पर्धकांनी ९ एप्रिल ते १५ एप्रिल या कालावधीत पाठविणे आवश्यक आहे. योग्य छायाचित्रांची निवड करून संबंधित स्पर्धकाला यावेळी सन्मानित केले जाणार आहे.
संपर्क, ९८२१७१९९८८. ९०८२४४९८४३.