प्रतिनिधी सागर रोड़े शिराळा : - येथील शहीद अण्णासाहेब राऊत बहुउद्देशीय संस्था व्दारा संचालित दुर्गा इंग्लिश प्रायमरी स्कूल मध्ये सुसंस्कारित उन्हाळी छंद शिबीराचा समारोप करण्यात आला.सर्वप्रथम शहीद अण्णासाहेब राऊत यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले.
नंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष मनोहरराव बुरंगे यांचा सत्कार नर्शिंगपुर येथील पुलिस पाटिल सौ वर्षा आरोळे यांनी श्याल व श्रीफल देऊन केला. अध्यक्ष मनोहर बुरंगे यानी सर्व मुलाना सुंदर असे भोजन देऊन प्रमाण पत्र वॉटप् करण्यात आला.
सदर कार्यक्रमाला राजेंद्र म्हस्के, अँड बुरंगे, बडोदा बॅकेचे मॅनेजर रवि आवटे, डॉ मुकुंदराव ढोणे, अध्यक्ष मनोहरराव बुरंगे, सागर महाराज मोहोड, ग्रा.पं सदस्य सुरेश गंधे, संस्थेचे राजेश भोवाळु आदी मान्यवर लाभले होते.
गावातील पालक व ग्रामस्थ डी आर वानखडे, पत्रकार सागर रोडे, सुभाष भागवत, अवधूत तायडे, सोमदेव बुरंगे आदी उपस्थित होते.विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उन्हळी छंद शिबीर दहा दिवस घेण्यात आले.
भारतीय पारंपरिक खेळ लगडी खोखो कबड्डी, संस्कृत भाषा अभंग चित्रकला स्पर्धा इत्यादी खेळ कॅम्पमध्ये घेतलीं आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मुख्याध्यापक प्रविण मोहरे यांनी केले.यावेळी शिक्षिका अर्चनाताई नागे दिक्षा मनवर वैष्णवी बोरकर समिक्षा देवें मेघा चौधरी समिक्षा लुंगे कडुबाई आदी उपस्थित होते.