नाशिक प्रतिनिधी श्याम जाधव
नाशिक : नाशिक रोड भीम नगर बुद्ध विहार जेलरोड येथे कार्यकर्ता संवाद मिळायचे आयोजन करण्यात आले होते.
भारतीय बौद्ध महासभा संस्थापक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संरक्षण महाउपासिका मिराताई यशवंत राव आंबेडकर ट्रस्टीचे चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर राष्ट्रीय सल्लागार ॲडव्होकेट प्रकाश यशवंतराव आंबेडकर नाशिक जिल्हा पश्चिम संदर्भ संस्थेच्या दिनांक 16 /4/ 2024 चे पत्रास अनुसरून कार्यकर्ता संवाद मेळावा करण्यात आले भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा पश्चिम विभागातील पुरुष विभाग आणि महिला विभाग यातील सर्व सन्माननीय पदाधिकारी म्हणजे महिला जिल्हा शाखा आणि जिल्हा शाखेचे पुरुष अध्यक्ष सरचिटणीस कोषाध्यक्ष सर्व सन्माननीय पदाधिकारी सर्व केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य समता सैनिक दलाचे सर्वसामान्य समता सैनिक तसेच माझी श्रामनेर बौद्धाचार्य नाशिक जिल्हा पश्चिम पुरुष आणि महिला शाखेच्या वतीने कार्यकर्ता संवाद मेळावा रविवार दिनांक 28 /4/ 2024 रोजी सकाळी 10 वाजता भिम नगर बुद्ध विहार जेलरोड नाशिक रोड येथे आयोजन करण्यात आले होते.
सदर मेळावा वरील विषयावर अत्यंत महत्त्वाचा व गांभीर्यपूर्ण होता. प्रमुख मार्गदर्शन आदरणीय बी एच गायकवाड गुरुजी राष्ट्रीय सचिव, आयुष्यमान वि म रूपवते गुरुजी माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, आयुष्यमती नी वैशालीताई अहिरे अध्यक्ष मुंबई प्रदेश, आयुष्यमान प्रवीण बी बागुल जिल्हाध्यक्ष नाशिक पश्चिम, आयुष्यमती नी सुरेखाताई बर्वे स्वागत अध्यक्ष महिला विभाग, राजू के जगताप जिल्हा सरचिटणीस, मंगलाताई वाघमारे सरचिटणीस महिला विभाग, आयुष्यमान मनोज एस गाडे जिल्हा कोषाध्यक्ष, रामचंद्र ताठे गुरुजी, पी के गांगुर्डे गुरुजी, विजय गांगुर्डे गुरुजी, रत्नाकर साळवे गुरुजी, अरुण भदर्गे गुरुजी, अरुण शिंदे गुरुजी, सर्व सन्माननीय जिल्हा शाखा पदाधिकारी तालुका शहर शाखा पदाधिकारी या कार्यकर्ता मेळावा प्रसंगी बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेब ( वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष )यांचे हात मजबूत करण्यासाठी शपथ ग्रहणाचा कार्यक्रम करण्यात आला प्रमुख मार्गदर्शन बी एच गायकवाड यांचे लाभले भंते सुमेध बोधी चैत्यभूमी ट्रस्ट यांनी त्रिशरण पंचशीला देऊन वातावरणा अगदी असे आनंदीमय करण्यात आले भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व शाखेचे कार्यकारणी यावेळेस उपस्थित होते.