मंगळवार दिनांक 05.03.2024 रोजी विशाखा समिती अंतर्गत इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालय अमरावती येथे सायबर क्राईम आणि सुरक्षा या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाला इंजी. मामेश माथनकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी समाजात सायबर क्राईम मधुन होत असलेले नुकसान व उपाय समर्पक उदाहरणे देऊन त्यावर उपाय उपस्थितांना पटवून दिले.तसेच मी सांगितलेले उपाय तुमच्या माध्यमातून समाजातील इतर घटकांपर्यंत पोहोचवा असे आवाहन केले.कार्यक्रमाला विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटी च्या कार्यकारिणी सदस्य प्रा.रागिणी देशमुख मॅडम यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणातून विचार व्यक्त केले. आणि प्रा. डॉ. पुनम चौधरी मॅडम विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटी कार्यकारिणी सदस्य यांनीही मार्गदर्शन केले.महाविदयालयाच्या प्राचार्य डॉ. सीमा अढाऊ मॅडम यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.वंदना हिवसे यांनी तर प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ. वामन जवंजाळ यांनी व आभार प्रदर्शन डॉ.मंदाकिनी मेश्राम यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थीनींनी चा सहभाग होता.
सायबर क्राईम आणि सुरक्षा या विषयावर "इंदिराबाई"मेघे महिला महाविद्यालय अमरावती येथे आयोजन
byGavakadachi Batmi
-
0