महिला दिनी महिलांचा सत्कार व फलाहार वाटप संपन्न...
चांदुर रेल्वे : जागतिक महिला दिन व महाशिवरात्रीच्या संयुक्त पर्वावर आज शुक्रवार दि ८ मार्चला महीला व पुरुषांचे रक्तगट आणि आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले.
स्थानिक डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख ज्येष्ठ नागरिक संघ व रुग्णमित्र संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आणि ग्रामीण रुग्णालयाच्या बहुमूल्य सहकार्याने आयोजीत या शिबिराची सुरुवात , सकलजनवादी क्रांतीच्या शिल्पकार राजमाता जिजाऊ माँसाहेब व डॉ पंजाबराव भाऊसाहेब यांच्या प्रतिमा पूजन, ज्येष्ठ नागरिक श्रीराम उर्फ बंडू भाऊ भैसे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाली.
या शिबिरात ग्रामीण रुग्णालयाच्या एन.सी. डी विभाग समन्वयक पूर्ती लाखोडे व त्यांच्या सहकाऱ्यांद्वारे उपस्थित महिला - पुरुषांची रक्तदाब, मधुमेह , रक्त शर्करा, मूत्र इत्यादींची तपासणी करण्यात आली. तर प्रा. अनंत देशमुख व त्यांचे सहकारी दत्ता ठवकर व अतुल मेटे यांनी रक्तगट तपासणी केली. सदर शिबिराचा लाभ जवळपास १०० नागरिकांनी घेतला. याप्रसंगी महिला दिनाचे औचीत्य साधून महिलांचा सत्कार व उपस्थितांना फलाहार वाटप रामदेव बाबा मंदिराच्या प्रांगणात करण्यात आला.
या शिबिरास निवृत्त औषधी निर्माण अधिकारी सतिश ना देशमुख, अरुण देशमुख, पूर्व नगरसेवक रमेश वाट, पूर्व नगरसेवक सतिश देशमुख यांचे मार्गदर्शन तर रामेश्वर गायगोले, रमेश कांबळे, अरुणा सुरजुसे, निर्मलाताई पटले, जुबेर पठाण, सुनिल सोनोणे, नरुले, इत्यादिंसह डांगरीपुरा परिसरातील अनेकांचे बहुमूल्य सहकार्य लाभले...