अमरावती : स्थानिक मनपसंद हॉटेल जुना बायपास बडनेरा रोड येथे संघटनेच्या कार्यालयात दिनांक 10 मार्च रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.वंदनाताई हरणे माजी नगरसेविका,प्रमुख पाहुणे सौ.ज्योती विल्हेकर पोलीस अधिकारी महिला सेल,सौ.स्नेहल माकोडे सेल टॅक्स अधिकारी,सौ.गंगाताई अंभोरे माजी सभापती, श्रीमती संध्याताई टिकले माजी उपमहापौर.प्रिया नेहर महिला कार्यकारिणी अध्यक्ष यांच्या हस्ते समाज भूषण डॉ.संतुजी लाड व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हारार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरवातीला सौ.मालती लवाटे यांनी स्वागतपर गीत सादर केले त्यानंतर सर्व प्रमुख पाहुणे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त आपले विचार व्यक्त केले.
तसेच महिला कार्यकारिणी उपाध्यक्ष सौ.अरुणा माहुरे यांनी महिलांनी आपले आरोग्य सांभाळून आपले क्षन्द जोपासावे असे सांगितले,अध्यक्षीय भाषणात वंदना हरणे यांनी समाजातील महिलांनी मागे न राहता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सतत पुढे जाण्याचा सल्ला दिला.यावेळी शारदा गायगोले,ज्योती डोईफोडे,अर्चना कंटाळे,मनिषा माहुरे,सोनल धनाडे,ममता कंटाळे,साधना माहूरकर,मंगला कंटाळे,मालती लवाटे,माधुरी माहूरकर,दुर्गा हरणे,वंदना मांडवे.,वंदना माहूरकर,अल्का नेहर,लक्ष्मीछाया पारवे,मिना कंटाळे,रेखा घन.इत्यादि समाज भगिनी तसेच संघटनेचे नंदूभाऊ हरणे,मोहन नेहर,रामेश्वर माहुरकर,सतीश माहुरे,विजय हरणे,मनोहर पारवे,सुरेश माहुरे,विजय धनाडे,शालीकराम कंटाळे,भास्कर माहुरकर,गजानन कंटाळे,रमेश लाड,राजू पारवे,लोयटे साहेब,मधुकर कंटाळे,रोहन नेहर,नवीन हरणे ईत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता धनाडे,प्रास्ताविक प्रिया नेहर यांनी केले.