रवी राणा यांच्या हस्ते खाटीक समाज परिवर्तन संघटनेच्या जागेचे भूमिपूजन व फलक अनावरण

 



अमरावती -खाटीक समाज परिवर्तन संघटना अमरावती यांच्या अथक प्रयत्नाने व आमदार रवि राणा यांच्या शिफारशीने गोविंदा पार्क,मनपसंद हॉटेल,लाली लॉन समोर,जुना बायपास बडनेरा रोड,मौजे वडद,अमरावती येथे हिंदू खाटीक समाजासाठी व्यायामशाळा,वाचनालय,सभागृह तसेच ईतर सामाजिक कार्यक्रमासाठी भव्य अशी प्रशस्त तीस हजार स्के.फूट म.न.पा.ची शासकीय जागा मिळालेली असून सदर जागेचे भूमिपूजन व फलक अनावरण सोहळा शनिवार दिनांक 2 मार्च2024 रोजी सायंकाळी 5 वाजता सदर नियोजित ठिकाणी सर्व खाटीक समाज बांधवांच्या उपस्थितीत पार पडला.



यावेळी प्रमुख अतिथी आमदार रवि राणा व संघटनेचे अध्यक्ष नंदकिशोर हरणे यांच्या शुभ हस्ते जागेचे भूमिपूजन व फलक अनावरण करण्यात आले.त्यानंतर रविभाऊ राणा ,ज्योती विल्हेकर महिला सेल पोलीस अधिकारी,अरुण धर्माळे राष्ट्रवादी काँग्रेस,व सर्व नवनियुक्त अध्यक्ष या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव मोहन नेहर यांनी केले,प्रमुख अतिथी रविभाऊ राणा यांनी आपल्या भाषणात सदर जागेवर समाजाकरिता प्रशस्त समाज भवन निर्माण करण्यासाठी आर्थिक तरतूद करण्याचे घोषित केले,प्राथमिक टप्प्यात 25लाख व दुसऱ्या टप्प्यात 25 लाख असे एकूण 50 लाख निधी देणार असल्याचे जाहीर केले,त्यानंतर अध्यक्षीय भाषणात नंदुभाऊ हरणे यांनी समाजाला प्रशस्त अशी जागा व बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले,या वेळी विठ्ठलराव कठाळे कार्याध्यक्ष,रामेश्वर माहुरकर कोषाध्यक्ष,प्रमोद हरणे,गजानन कंटाळे उपाध्यक्ष,सतिश माहुरे सहसचिव,विजय हरणे,डॉ.श्रीकृष्ण कंटाळे,सुरेश माहुरे,भास्कर माहुरकर,धनंजय माहुरकर, राजकुमार दुर्गे,माणिक नेहर,मनोहर पारवे,शालीकराम कंटाळे,जितू घनघोरकर,पवन सदाफळे,सतीश हरणे,संतोष हरणे,गजानन लवटे,संजय कुर्हेकर,बबन विल्हेकर,प्रिया नेहर,पूनम माहुरे,नीता धनाडे,अरुणा माहुरे,अर्चना कंटाळे,सोनल धनाडे,मनीषा माहुरे,साधना माहुरकर, वंदना हरणे,वंदना मंडवे, वंदना माहुरकर, ममता कंटाळे इत्यादी पदाधिकारी व संपूर्ण जिल्ह्यातील पदाधिकारी व खाटीक समाजाचे महिला व पुरुष उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post