प्रतिनिधी/ प्रमोद घाटे-: मोर्शी तालुक्यातील ग्राम नया वाठोडा येथे ग्रामपंचायतला ग्राम विकासाकरिता वीस लक्ष निधी अमरावतीच्या खासदार नवनीत जी राणा यांचे खासदार निधीतून देण्यात आला असून नुकताच भूमिपूजन कार्यक्रमात मोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संजय तट्टे यांचा खासदार नवनीत राणा यांचे हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
अमरावती लोकसभा मतदारसंघातील ग्राम नया वाठोडा हे एक छोटसं गाव असून या गावातील विकासात्मक कामे झाली नव्हती. यात समाज मंदिर बांधकामा करिता दहा लाख रुपये आणि ग्रामपंचायत इमारत बांधकामा करिता दहा लाख रुपये असा खासदार फंडातून निधी अमरावतीच्या खासदार नवनीतजी राणा यांनी देऊन नुकताच या निधीचा खासदार यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला.
याच कार्यक्रमात खासदार नवनीत राणा यांचे हस्ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संजय तट्टे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार नवनीत राणा, उपसभापती संजय तट्टे, गावच्या सरपंच राजकन्या कुरवाडे, उपसरपंच दीपक बाभुळकर, कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सेवानिवृत्त तलाठी राजेंद्र तट्टे , ग्रामसेवक विनोद मनवर, राजेंद्र तायवाडे विठ्ठलराव गाडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष कैलास ठाकूर यांचे उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक विनोद मनवर यांनी केले. गावात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामवाशी यांनी खासदार नवनीत राणा यांचे आभार मानले.