युवाशक्ती ग्रामविकास संगठण अमरावती जिल्हा उपाध्यक्षपदी प्रमोद घाटे यांची नेमणूक
श्रीकृष्ण रौराळे ,अमरावती
मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई येथिल सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार प्रमोद घाटे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन युवाशक्ती ग्रामविकास संगठण महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री. इमरान पठाण व कार्यकारिणी ने प्रमोद घाटे यांची युवाशक्ती ग्रामविकास संगठण महाराष्ट्र राज्य अमरावती जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करून नियुक्ती पत्र देऊन पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..