अकोला- अकोला शहरातील एक धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते,बांधकाम व्यवसायी व अभियंता,शासनाच्या विज सनियंत्रण समितीचे सदस्य व लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे केन्द्रीय उपाध्यक्ष किशोर मानकर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप च्या कार्यकारिणीच्या निमंत्रीत सदस्य या मानाच्या पदावर विराजमान करण्यात आले आहे.प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दि.२९ फेब्रूवारीच्या नियुक्तीपत्राव्दारे ही निवड घोषित करून किशोर मानकर यांचे खास अभिनंदन केले आहे.
किशोर मानकर हे सामाजिक क्षेत्रात सर्वसमाजाभिमुख कार्याने परिचित असून विज संनियंत्रण समितीच्या माध्यमातून त्यांनी शहरी आणि ग्रामीण भागातील जनतेच्या विजक्षेत्रातील अडचणी सोडविण्याचे प्रभावी कार्य केलेले आहे.यासोबतच आध्यात्मिक,सामाजिक आणि स्वतःचे "विदर्भ उडान" या साप्ताहिक वृत्तपत्राचे संपादक म्हणून ते पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेच्या माध्यमातून ते महाराष्ट्रातील संघटना संबंधित पत्रकार,वकील,डॉक्टर्स अभियंता बांधवांमध्ये जनतेच्या समस्यांना वाचा फोडणारे एक आक्रमक समाजसेवी पत्रकार म्हणूनही सुपरिचित आहेत.
त्यांनी आपल्या या नियुक्तीचे श्रेय महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर,माजी राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर डॉ.अशोक ओळंबे,भाजप नेते राजू भाऊ टाकळकर,ज्येष्ठ नेते पंडितराव कुळकर्णी यांना दिले आहे.त्यांच्या नियुक्ती लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ,त्यांची मित्रमंडळी आणि सर्वच क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.