पंचायत समिती, आर्वी येथील सुनिता प. मरस्कोल्हे, गटविकास अधिकारी (श्रेणी-१) ह्या रुजु झाल्यापासुन प्रत्येक कार्यालयीन दिवसाला पंचायत समिती, आर्वी येथील अधिकारी, कर्मचारी, शिपाई, वाहन चालक व हातपंप मजुर या सर्वांना शारीरिक, मानसिक आर्थीक छळ खालील प्रमाणे देत आहे.
मुद्दा क्रमांक १. 👉🏻 गटविकास अधिकारी (श्रेणी-१) हया या कार्यालयात रुजु होताच त्यांना शासकीय निवास स्थान सर्व सोईनिशी उपलब्ध असतांना सुध्दा त्या नाममात्र खाजगी खोली करुन राहतात.
मुद्दा क्रमांक २.👉🏻 प्रथम दिवसी त्यांनी पंचायत विभागातील अधिका-यांना सांगून ग्रामसेवकां कडुन तिन सिलींग फैन व बॉक्स चा मोठा दिवान त्यांच्या खाजगी खोली करीता मागीतला त्या गविअ (श्रेणी -१) असल्याने भिती पोटी त्यांना वर्गणी करून देण्यात आला. त्यामुळे कर्मचा-यांवर विनाकारण आर्थीक बोजा सहन करावा लागला.
मुद्दा क्रमांक ३👉🏻 गटविकास अधिकारी (श्रेणी-१) यांचे कडे कोणत्याही विभागाच्या नस्त्या किंवा डाक माकींग ला गेलो असता त्या सदर नस्त्या २-३ दिवस प्रलंबीत ठेऊन नंतर स्वाक्षरी करतात व दिनांक मात्र अगोदरची टाकतात.
मुद्दा क्रमांक ४.👉🏻 गटविकास अधिकारी (श्रेणी-१) यांनी नाम मात्र खोली केली असली तरी त्या नागपुर वरुन ये जा करतात व त्यांची धावपळ वाढते. कार्यालयात उशीराने येऊन रात्री पर्यंत अधिकारी, कर्मचारी व शिपाई यांना नेहमीच रात्री ७.३०-८.३० वाजे पर्यंत कायर्यालयात राहावे लागते.
मुद्दा क्रमांक ५ 👉🏻 कार्यालयात प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांना कितीही महत्वाचे नस्ती वर स्वाक्षरी घ्यावयाची असल्यास घंटोगीणती गटविकास अधिकारी यांचे कक्षा बाहेर उभे रहावे लागते. त्यांचे कक्षात गेल्यावर अधिकारी व कर्मचान्यांना सतत उभे ठेवतात त्यांचे कक्षात सविस्तर चर्चेसाठी खुर्चीवर सुध्दा बसु देत नाही व बसल्यास इतर पदाधिकारी, लाभार्थी यांचे समोर अपमानीत करतात व खुर्चीवर बसलेले असल्यास उभे रहावयाला सांगतात व मी वर्ग -१ अधिकारी आहे. या बाबत वारंवार कर्मचारी व अधिकाऱ्यांना दम देत असतात.
मुद्दा क्रमांक ६ 👉🏻 गटविकास अधिकारी (श्रेणी-१) ह्या त्यांच्या कक्षात प्रत्येक दिवशी या ना त्या कारणावरुन प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याला अपमाणीत करत असतात.
शिपाईनी त्यांची पिण्याचे पाण्याची बॉटल उपडुन देण्या पासुन तर गाडी चं दार उघडुन देण्यापर्यंत कामे करावी लागतात. व शिपाई रात्री ८ नंतरच कार्यालयातुन घरी जाऊ शकतो.
मुद्दा क्रमांक ७ 👉🏻 गटविकास अधिकारी (श्रेणी-१) यांना नागपुर वरुन तळेगांव ला आल्यानंतर तळेगांव शा.पं. है या तालुक्याच्या कार्यक्षेत्रा बाहेर असुन ही शासकीय वाहन चालकाला शासकीय वाहन घेऊन तळेगांव ला ने आण करावी लागते.
जर वाहन चालक व वाहन उपलब्ध नसल्यास त्यांना त्यांचे खाजगी वाहन ने रात्री ९ नंतर नागपुर ला सोडुन द्यावे लागते. व वाहन चालकाला नागपुर वरुन रात्री १२ नंतर आर्वी येथे परत यावे लागते व वाहन चालकाला नेहमीच त्रास दिल्या जातो.
मुद्दा क्रमांक ८ 👉🏻 गटविकास अधिकारी (श्रेणी-१) घरकुल (मोदी आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत) योजना संदर्भात ग्रामपंचायत ने ठरावा व्दारे प्रस्तावीत केलेले पात्र लाभार्थी यांना डावलून नियम बाह्य पध्दतीने याद्या वरीष्ठ कार्यालयात सादर करावयाला लावतात. व चुकीचे मौखीक आदेश देऊन चुकीची कार्यालयीन कामे करावयाला लावतात तसेच या बाबत माहीती अधिकार मार्फत कोणी माहीती मागविली तर याद्या तयार करणा-या कर्मचाऱ्याला दोष देवुन कार्यवाही करणे वेतनवाढ थांबणे निलंबीत करणे स्वरुपाची कार्यवाही करेल अश्या म्हणतात.
मुद्दा क्रमांक ९ 👉🏻 गटविकास अधिकारी (श्रेणी-१) कार्यालयीन देयके हे माझ्या काळातील नाहीत म्हणून लेखा विभागाकडून तपासणी झाल्यानंतर सुध्दा प्रलंबीत ठेवतात स्वाक्षरी करीत नाही. कार्यालयीन देयके मंजुर करतांना त्रास देतात.
मुद्दा क्रमांक १०👉🏻 गटविकास अधिकारी (श्रेणी-१) ह्या कार्यालयातील कोणते ही कर्मचारी आजारी पडल्यास त्यांचे सुटीच्या अर्जावर वैद्यकीय अधिकारीचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरही कारणे दाखवा नोटीस द्या असं लिहीतात तसेच कितीही महत्वाच्या कारणासाठी रजेवर जावयाचे असल्यास रजा कपात करतात व नामंजुर करतात.
मुद्दा क्रमांक ११ 👉🏻 गटविकास अधिकारी (श्रेणी-१) ह्या पंचायत समिती, आर्वी ह्या कार्यालयात व मा.गविअ यांचे कक्षात पुरेश्या खुर्च्या उपलब्ध होत्या त्यामधील कार्यालयातील ६ खुर्च्या १ कुलर व कार्यालयीन टेबल गविअ यांनी त्यांचे खाजगी खोलीवर नियम बाहय पध्दतीने नेलेल्या आहेत. हा एक अतिशय गंभीर गुन्हा
आहे.
मुद्दा क्रमांक १२ 👉🏻 गटविकास अधिकारी (श्रेणी-१) यांचे करीता पंचायत समिती, आर्वी येथे स्वच्छतागृहासह कक्ष उपलब्ध असतांना जुना पंचायत विभागाचा कक्ष इमारत मा. मु.का.अ. जि.प. वर्षा यांची परवानगी न घेता इमारतीचे स्ट्रकचर बदलविले आहे.
शाखा अभियंता यांचेवर मानसिक दबाव असल्याने त्यांना ह्या कामाचे प्राकलन करावे लागले सदर खर्च हा पंचायत समिती, सेस फंडातुन केल्या जात आहे परंतु सदर इमारतीचे काम हे बांधकाम उपविभाग जि.प. आर्वी यांचे कडुन करावयाचे असतांना सुध्दा नियम बाह्य पध्दतीने दबाब तंत्राचा वापर करुन केल्या जात आहे.
मुद्दा क्रमांक १३👉🏻 मग्रारोहयो अंतर्गत ३०० सिंचन विहीरींना कार्यरंभ आदेश देउन ही त्यानंतर त्याविहीरी ची कामे तात्काळ सुरु करावयाची होती परंतु गविकास अधिकारी (श्रेणी-५) यांनी कार्यरंभ आदेश दिल्यानंतर लाभार्थी यांचे नस्ती मध्ये काहींना काही किरकोळ त्रुटी काढून कामे सुरु करण्यास अडथळा निर्माण करीत आहे.
त्यामुळे लाभार्थीचा व काही ग्रामरोजगार सेवक यांचा रोष मग्रारोहयो अंतर्गत काम करणा-या यंत्रणेवर येत आहे. तसेच सहायक कार्यक्रम अधिकारी ह्या आधिक व्यावहार करुन विहीरी मंजुर करतात असे खोटे आरोप लावुन गविअ ह्या त्यांच्यावर आर्थीक व मानसिक दबाव टाकतात.
मुद्दा क्रमांक १४ 👉🏻 पंचायत विभागातील वरीष्ठ सहायक महीला कर्मचारी कार्यालयात व्यवस्थीत काम करीत असतांना त्यांचे टेबल बदलीचे ५ वेगवेगळे आदेश काढण्यात आले. तसेच एका कर्मचा-याला निवडणुकीच्या कामा करीता कार्यमुक्त केल्यानंतरही पंचायत समितीची संपूर्ण कामे करुनच निवडणुकीची कामे करावेत असे आदेशीत करण्यात आले. निवडणुकीचे महत्त्वाचे कामाला सदर कर्मचा-याला प्राधान्य देता येत नाही.
मुद्दा क्रमांक १५ 👉🏻 या कार्यालयातील संपूर्ण अधिकारी व कर्मचारी, शिपाई, वाहन चालक हे गटविकास अधिकारी (श्रेणी-१) यांचे चुकीचे प्रशासनिक वागणुकीमुळे प्रचंड दबावाखाली आले असुन कार्यालयातील कर्मचान्यांचा उच्च रक्तदाब होणे, मधुमेह वाढणे व इतर मानसिक आजाराचे बळी पडण्याची वा जिवीत हानी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
गटविकास अधिकारी (श्रेणी-१) यांचे कर्मचा-यासोबत काम करण्याच्या चुकीच्या पध्दतीमुळे हद्याघात, ब्रेन हंगरेज व इतर मानसिक आजार झाल्यास याला सर्वस्वी गटविकास अधिकारी पंचायत समिती, आर्वी ह्या राहतील.
मुद्दा क्रमांक १६👉🏻 गटविकास अधिकारी (श्रेणी-१) यांना तहसिल कार्यालय आदी येथे निवडणुकीच्या अत्यंत महत्वाच्या नस्तीवर स्वाक्षरी करयाच्या असंतांना सुध्दा सप्रभ / कप्रअ यांना सदर निवडणुकीच्या फाईल्स तहसिल मधून आणुन नागपूरला शिपाई यांना सायंकाळी पाठवावे असे दबाव टाकतात अशा महत्वाच्या फाईल प्रवासात गहाळ झाल्यास कार्यालयातील कर्मचारी दोषी आढळून येईल. इतर वेळी बांधकाम विभागातील कर्मचा-यांचे काम नसतांना सुध्दा कार्यालयीन फाईल घेवून नागपूरला बोलावतात.
मुद्दा क्रमांक १७ 👉🏻 गटविकास अधिकारी (श्रेणी-१) हया या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचेमध्ये खोटे बोलून आपसामध्ये भांडणे लावतात त्यामुळे अधिकारी व कर्मचारी यांची सदर गविअ यांचे प्रशासनात काम करण्याची मानसिकता राहलेली नाही.
मुद्दा क्रमांक १८ 👉🏻 गटविकास अधिकारी (श्रेणी-१) हया घरकूल, सिंचन विहीरी व रोष्टर फाईल मंजुर करण्या करीता संबंधीत अधिकारी, कर्मचारी यांचे कडे पैश्याची मागणी करतात परंतु गटविकास अधिकारी (श्रेणी-१) ह्या उच्च पदावर असल्याने या बाबत तुम्ही बाहेर बोलल्यास मी तुमची वेतन वाढ व निलंबीत करुन शकते असा नेहमी दम देत असतात. त्यामुळे कार्यालयातील सर्व कर्मचारी अधिकारी धास्तावलेले आहेत.
तरी या कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा सहानुभूती पूर्वक विचार करुन गट विकास अधिकारी ( श्रेणी-१), पंचायत समिती, आर्वी यांची तात्काळ इतरत्र बदली करण्यात यावी..
अशी पंचायत समिती आर्वी येथील कर्मचारी कडून मागणी होत आहे.
गटविकास अधिकारी आर्वी यांची प्रतिक्रिया गावाकडची YouTube channel वर