नाशिक येथे राजेश टारपे यांना समाज भूषण पुरस्काराने सन्मानित

 




राजेश टारपे यांना समाज भूषण पुरस्कार



विशेष प्रतिनिधी, अनिल बंगाळे


बुलडाणा : आम्ही सुवर्णकार मंडळ प्रणित, परोपकार फाउंडेशन नाशिकच्या वतीने कर्तबगार व्यक्तींना/संस्थाना दर वर्षी कै. ग. भा. द्वारकाबाई उत्तमराव अष्टेकर यांच्या स्मरणार्थ गणेश शेठ उत्तमराव अष्टेकर यांच्या वतीने समाजभूषण पुरस्कार देण्यात येते.

आदिवासी कला शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आदिवासी ग्रामीण भागातील पहिली अंध विद्यालय बोधडी ता. किनवट ही शाळा चालविण्यात येते.

या शाळेच्या माध्यमातून राजेश टारपे संस्थेचे अध्यक्ष या नात्याने आदिवासी ग्रामीण भागातील अंध मुलांना दृष्टी दाखविण्याचे काम मागिल दहा वर्षापासून सातत्याने करत असून शेकडो अंध मुलांना शिक्षण देऊन स्वतःच्या पायवर उभा करण्याचे काम करत आहेत तसेच सदरील शाळेचे संगीत क्षेत्रात फार मोठे नाव असून मागिल वर्षी शाळेला महाराष्ट्रातील उत्कृष्ट संगीत केंद्र म्हणून अखिल भारतीय गंधर्व मंडळ मुबंईकडून पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता.

    तसेच संस्थेच्या माध्यमातून किनवट बहुल आदिवासी भागात आदिवासी दलित मागासवर्गीय मुलींच्या शिक्षणासाठी सामाजिक न्याय विभागाचे मागिल वीस वर्षा पासून निवासी वसतिगृह चालवीतात त्यामुळे गरिबातील गरीब मुलींना राहण्याची व जेवणाची सोय मिळाल्यामुळे आता पर्यत शेकडो मुलींना शिक्षणाच्या प्रव्हात अणण्याचे काम करत आहेत. बुलडाणाजिल्ह्यात मागिल पंचवीस वर्षापासून जिल्हा रुग्णालयात शासकीय नौकरी करत असताना आदिवासी दलित मागासवर्गीय समाजाची सेवा करत आहेत. 

     अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून दऱ्या खोऱ्यात राहणाऱ्या आदिवासी समाजाला शासकीय योजना मिळवून देणे त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचार झाला तर न्याय मिळवून देण्याचे काम करत आहेत.

        सदरील कामाची दखल घेऊन नाशिक येथील सामाजिक क्षेत्रात कामकरणारे आम्ही सुवर्णाकार मंडळ प्रणित परोपकार फाऊंडेशन नाशिक यांनी यावर्षीचा समाज भूषण पुरस्कार बुलडाण्याचे आदिवासी कला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेश टारपे यांना 11 मार्च रोजी श्री संत नरहरी कुलथे मंगल कार्यालय नाशिक येथे सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गणेशशेठ अष्टेकर होते प्रमुख पाहुणे कैलास शेठ भांबुर्डेकर गोपाळशेठ कुलथे , इंजि. शाहूशेठ,मधुकर शेठ टाक, भगवानसेठ शहाणे आदी मान्यवर उपस्थित होते.

 तसेच या कार्यक्रमाच्या आयोजक मीनाताई सोनार संस्थापक अध्यक्ष तसेच सुभाष बोराडे, रमेशराव नागरे, कविताताई पाटील,संजय बोडके,दत्ताशेठ दहीवाळ शिवाजीआण्णा लोणार,बाळासाहेब बोराडे तसेच प्रसिद्धीप्रमुख गोकुळ लोखंडे, मीनाताई, पुष्पाताई कुलथे अंजलीताई महाले, सविताताई दहिवाळ,आधी मान्यवरांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता..

Post a Comment

Previous Post Next Post