विविध विषयांवर होणार चर्चा
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या मोर्शी तालुका शाखेच्या वतीने ६ मार्च बुधवार ला सकाळी ११.३० वाजता मोर्शी तालुक्यातील श्रीक्षेत्र पिंगळादेवी गडावर पदाधिकारी बैठक व स्नेहभोजन कार्यक्रम आयोजित केला आहे. या बैठकीला केंद्रीय पदाधिकाऱ्यांसह राज्य कार्यकारिणी सदस्य आणि जिल्हा कार्यकारिणी सदस्य महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करतील. संघटना बांधणी वर चर्चा करणे सन २०२४-२५ या वर्षा साठी तालुका कार्यकारिणी निवडने, पुढील वर्षासाठी संघटनात्मक कार्यक्रम ठरविने आणि वेळेवर येणारे विषय हे अध्यक्षांच्या परवानगीने चर्चिले जातील.
सभेला संस्थापक अध्यक्ष तथा केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने, केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान, केंद्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे, केंद्रीय महासचीव सुरेश सवळे, केंद्रीय सचिव अशोक पवार, केंद्रीय कोषाध्यक्ष अशोक यावूल, केंद्रीय संपर्कप्रमुख प्रा. रविंद्र मेंढे, केंद्रीय विधी सल्लागार सौ.किरण भुते केंद्रीय सदस्य व महिला मंच प्रदेशाध्यक्ष जयश्री पंडागडे, केंद्रीय सदस्य तथा प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख, केंद्रीय कार्यालय प्रमुख बाबाराव खडसे, केंद्रीय संघटक माणिकराव ठाकरे, केंद्रीय सल्लागार प्रदिप जोशी, केंद्रीय सदस्य बाळासाहेब सोरगीवकर, केंद्रीय सदस्य अंबादास सीनकर, महाराष्ट्र प्रदेश सचिव राजेंद्र ठाकरे, महिला महाराष्ट्र प्रदेश सचिव कांचन मुरके, जिल्हाध्यक्ष उमेश भुजाडणे, जिल्हा संपर्कप्रमुख ओमप्रकाश कुऱ्हाडे, जिल्हा संपर्कप्रमुख राहुल कविटकर,आदि मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करतिल असे मोर्शी तालुका कार्यकारिणी अध्यक्ष कैलास ठाकूर यांनी कळविले आहे.