कला व विज्ञान महाविद्यालय कुऱ्हा येथील राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर

 



कला व विज्ञान महाविद्यालय कुऱ्हा येथील राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर दि. 23.02.2024 ते 01.03.2024 पर्यंत ग्राम कौडण्यापुर येथे आयोजित होते या शिबिरा दरम्यान विद्यार्थ्यांनी गावामध्ये मतदान आणि मतदान जनजागृती अभियान अंतर्गत पथनाट्य व विविध कार्यक्रम आयोजित करून लोकांमध्ये मतदान जनजागृती केली. 

    तसेच दि.29.2.2024 ला.भाजपा कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र राज्य मा.रविराज देशमुख यांना कला व विज्ञान महाविद्यालय कुऱ्हा राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात मतदान जनजागृती निमित्त कार्यक्रमात मार्गदर्शन करण्याकरीता विशेष अतिथी म्हणून बोलाविले व त्यांनी विद्यार्थिनींना व विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले .त्यांनी आपल्या मार्गदर्शनामधून मतदानासाठी आवाहन केले. शिबिरार्थी यांना त्यांनी मतदानच महत्व लोकशाहीत किती महत्वाचं आहे हे समजावून सांगितलं .विद्यार्थ्यांना मतदानासाठी प्रवृत्त केले . या कार्यक्रमाचे आयोजन रासेयो विभागाने केले.

Post a Comment

Previous Post Next Post