भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा ग्रामीण पदाधिकारी मेळावा दिनांक १० मार्च ला दुपारी २ वाजता राजापेठ येथिल भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात पार पडला यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविराज देशमुख, ॲड पद्माकर बाबाराव सांगोळे जिल्हा अध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा अमरावती जिल्हा ग्रामीण
प्रामुख्याने उपस्थित होते. या मेळाव्याला ग्रामीण भागातील महिला व पुरुष, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिला व पुरुष पदाधिकारी यांच्या नियुक्ती करण्यात आल्या व मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या..