पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती महिला मंडळ हुडकेश्वर रोड,नागपूर या समितीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक 9/3/2024 ला मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले होते.
सुरुवातीला पाहुण्यांचे स्वागत गीताने करण्यात आले या शिबिराचे अध्यक्ष स्थान वंदना विनोद बरडे यांनी भूषविले आणि कार्यक्रमाचे रीतसर उद्घाटन प्रमुख पाहुणे असलेले डॉ. अरुणराव घायवट यांनी केले सदर शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित होती.
प्रमुख डॉक्टर रिजू चिमोटे स्त्रीरोग विशेषज्ञ,डॉ. पराग राहातेकर हृदयरोग तज्ञ,नरेंद्र सावरकर साहेब व आरती मॅडम होते तर प्रमुख वक्ते म्हणून उमंग जैन, रिजनल हेड अरिहंत मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल नागपूर हे होते.
या शिबिरामध्ये बीपी,शुगर, ईसीजी,नेत्र तपासणी, दंत तपासणी आणि महिलांच्या सर्व प्रकारच्या आरोग्य तपासणी ह्या अगदी मोफत करण्यात आल्यात.या शिबिराचा समाज बांधव व भगिनींनी तसेच या परिसरामध्ये राहणाऱ्या जवळपास 200 युवा तरुण, तरुणींनी तसेच म्हाताऱ्या (ओल्ड येज ) लोकांनी आरोग्य तपासणीचा फायदा घेतला.
कार्यक्रमाच्या सुरवातीला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीचे पूजन संस्थेचे संस्थापक मानद सचिव श्री महादेवराव पातोंड साहेब,डॉ. अरुणराव घायवट आणि वंदना विनोद बरडे,व समितीच्या पुरुष आणि महिला मंडळाच्या सर्व कार्यकारणी सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.कार्यक्रम अतिशय सुंदर रित्या शांततेत पार पडला.
कार्यक्रमाच्या शेवटी महिलांनी बाई पण भारी देवा या गाण्यावर खूप सुंदर डान्स केला.या सर्व कार्यक्रमाचे सूत्र संचालन सावलकर मॅडम आणि अश्विनी शरदराव उरकुडे यांनी केले.
आभारप्रदर्शन संजीवनी घुरडे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्विते करिता सौ.कापडे मॅडम,दीपिका वरखडे, इत्यादींनी सहकार्य केले. वंदना विनोद बरडे अधीसेवीका,सामाजिक कार्यकर्त्या यांनी आरोग्याच्या जनजागृतीचे पोस्टर प्रदर्शनी लावली होती.मंचावरील सर्व तज्ञ मंडळ व अध्यक्ष व मान्यवर यांनी आपापल्या फिल्डची माहिती दिली.
महीला दिनानिमित्त झीरोतुन हिरो अश्या महिलेचा सत्कार वंदना विनोद बरडे अध्यक्ष यांनी केला त्यांच नाव आहे भारती कमलेश जैन.राष्ट्रगिताने कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.आणी आरोग्यदायी अम्रुता आहाराचे वाटप करण्यात आले.