प्रतिनिधी प्रमोद घाटे नेरपिंगळाई : दि.१/३/२०२४ रोजी जि प मुलांची शाळा निरपिंळाई येथील वर्ग तीन ते सातच्या विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातील विविधतेची ओळख व्हावी यासाठी विद्यार्थ्यांना श्री शेत्र पिंगळादेवी गड संस्थान येथे एक दिवशीय परिसर भेट कार्यक्रम पार पाडण्यात आला.
यामध्ये प्राचीन कापूर तलावा विषयी माहिती तसेच विविध वृक्षांविषयी माहिती देण्यात आली तसेच श्रमदान करून विद्यार्थ्यांनी प्लास्टिक पिशव्या कचरा जमा करून ते नष्ट करण्यात आले त्यानंतर स्नेहभोजन करण्यात आले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक विजय खंडारकर केंद्रप्रमुख मोहन निवृत्ती सहाय्यक शिक्षक सुनील डेहनकर कल्पना माहीतकर कुमारी जयश्री शेकार वाघ अर्चना खोले रजनी रघुवंशी सुलक्षणा शहाणे स्मिता शकुकर प्रतिभा सावरकर कुमारी ऋतुजा राऊत तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप बघेकर सदस्य प्रवीण पाचघरे मीनल भोजने आदींनी परिश्रम घेतले.