एकतेचे प्रतीक म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांनीच केले कार्यक्रमाचे आयोजन
१९ फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्मोत्सव सोहळा सगळीकडे साजरा करीत असताना गंगाजळी या छोट्याश्या गावात सुद्धा एकतेचे प्रतीक म्हणून बौद्धविहारात अतिशय उत्साहात आणि आनंदात शिवजयंती साजरी करण्यात आली. सदरच्या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन चिमुकल्या विध्यार्थ्यानी केले हे मात्र विशेष..
सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई यांच्या पुतळ्याचे पूजन व हारार्पण महेश कुरसंगे, भारती गावंडे, सुरज वानखडे, व विजय माटे यांनी केले. त्यानंतर विध्यार्थी आचल इंगोले, यश गावंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर भाषणे दिली तर नेहमीप्रमाणे गंगाजळी गावाच्या पोलीस पाटील भारती नरेश गावंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज विषयी सुंदर असे गीत सादर केले.
यावेळी कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती. सदरच्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन विद्यार्थिनी तनवी निलेश इंगोले हिने केले तर आभार प्रदर्शन प्राची रवी वानखडे या विध्यार्थीने केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्व चिमुकल्या विद्यार्थिनी विशेष मेहनत घेतली