Amaravati news | आज सर्वोच्च न्यायालयात नवनीत राणा यांच्या वतीने उच्च न्यायालय मुंबई यांनी दिलेल्या 116 पानांच्या जजमेंट वर सुनावणी घेण्यात आली.
ज्यामध्ये उच्च न्यायालयाने यापूर्वी त्यांना 2,00000(दोन लाख रुपये) दंड करून त्यांची जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश दिलेले आहेत.
सदर न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणारी सुप्रीम कोर्टात याचिका त्यांच्या वतीने दाखल करण्यात आली होती. त्यामध्ये आज सुमारे दोन तास सुनावणी झाली व दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. उर्वरित सुनावणी उद्या सकाळी साडेदहा वाजता न्यायमूर्ती माहेश्वरी व न्यायमूर्ती करोल साहेबांकडे घेण्यात येणार आहे.
सदर प्रकरणात ज्या पद्धतीने बनावट कागदपत्रांचा उपयोग केला गेलेला आहे त्या संदर्भात दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद करण्यात आला..
यावेळी भीम ब्रिगेड संघटनेचे पदाधिकारी अंकुश आठवले केवल हिवराळे मनोज चक्रे सतीश दुर्योधन ,साहील आढले, अक्षय शिनकर, प्रशिक पाटील, मोठ्या संख्येने भिम ब्रिगेड पदाधिकारी उपस्थित होते..