२२ फेब्रुवारीला शासकीय ग्रामीण रुग्णालय सवना येथे महा रक्तदान शिबिर

 




महागाव श्रीकांत राऊत , यवतमाळ 


महागाव  जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान आयोजित महारक्तदान शिबीर (दि. १० फेब्रुवारी ते दि.२४ फेब्रुवारी २०२४ या दरम्यान

दिनांक : 22 फेब्रुवारी २०२४ | सकाळी 9 ते ५ वाजेपर्यंत

स्थळ : शासकीय ग्रामीण रुग्णालय, सवाना ता. महागाव जिल्हा:यवतमाळ

अनंत श्री विभूषित जगद्‌गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने स्व-स्वरुप संप्रदाय तर्फे दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित केले जाते.

आपल्या महाराष्ट्रात सिकलसेल अनेमिया, हिमोफिलीया, थैलॅसेमिआ, ब्लड कॅन्सर, किडनी फेल्युअर पेशंट जास्त आढळतात. अशा रुग्णांना वारंवार रक्ताची नितांत आवश्यकता असते. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना रक्तबाटल्या देण्याचे आमच्या संप्रदाया मार्फत निश्चित केले आहे.

आपल्या दैनंदिन जीवनातील फक्त ५ मिनिटे रक्तदानासाठी आवश्यक आहेत. तुमच्यासाठी ते आहे फक्त दान, मात्र गरजूंसाठी ते आहे जीवनदान ! स्वतः बरोबर आपल्या मित्र व नातेवाईकांस या महान रक्तदान कार्यासाठी प्रवृत्त करा.

तरी आपल्या व्यस्त दिनचर्येतून आमच्यासाठी आपला बहुमोल वेळ काढून वरिल ठिकाणी रक्तदान करण्यास येवून या सामाजिक कार्यात सहभागी होवून आम्हास उपकृत करावे, ही विनंती.


रक्तदानाचे फायदे:


1)रक्तदान केल्यावर शरीरातील रक्त तयार करणाऱ्या पेशींना प्रेरणा मिळून ४८

तासात नवीन शुद्ध रक्त पूर्णपणे भरुन निघते.


2)रोग प्रतिकार शक्ती वाढते.


3)नियमित ३-४ महिन्यांनी रक्तदान केल्यास रक्तदाब, कर्करोग, हृदयविकार, येण्याचे प्रमाण कमी होते.


रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान

Post a Comment

Previous Post Next Post