▪️ हरताळा येथे भव्य रक्तदान शिबिर व शिव पूजन सोहळा संपन्न....
▪️ 47 तरुणांनी केले रक्तदान....
रक्तदान चळवळ व्यापक करा व राष्ट्रपुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी सामाजिक उपक्रमाने साजरी करा - युवा नेते प्रकाश साबळे यांचे तरुणांना आवाहन..
छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा सामाजिक समतेचा इतिहास प्रत्येक मनामनामध्ये रुजवण्याची गरज- सोमेश गावंडे यांचे मनोगत...
सदर सोहळ्यास प्रमुख मान्यवरांमध्ये सरपंच सौ नूतन काळे,उपसरपंच सौ संजीवनी रघुवंशी,सामाजिक कार्यकर्ते सुनील भगत, भूषण हिवराळे, .उमेश देशमुख, ज्ञानेश्वर काळे उपस्थित होते... सदर शिवजयंती चे आयोजन ज्ञानेश्वर काळे, अमर इंगळे तसेच एस फाउंडेशन, पंचशील महिला मंडळ हरताळा, गडलिंगे सामाजिक व धर्मदाय ट्रस्ट हरताळा, दीपस्तंभ मैत्रीय संघ हरताळा यांनी यशस्वीरित्या पार पाडले.