गरजू रूग्णांना आरोग्यदायी मदतीचा हात...!!

 




 ३८ गरजू रूग्णांना आरोग्यदायी मदतीचा हात...!!


रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा....!!


आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय व स्मृती सेवाश्रम नया अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने..




दि. ०९-०२-२०२४ रोजी आरोग्य शिबिर संपन्न झाले.


   ३८ गरजू रुग्णांना मोतीबिंदू , हृदयविकार, हरनिया, गाठीचे आजार तसेच विविध रोगावरील शस्त्रक्रियेसाठी सावंगी मेघे हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले.


     या शिबिरात माहुली जहागिरी, खानापूर, रामा , चांदई, कुंभारगाव, टाकरखेडा, नांदुरा, पथ्रोट,नांदुरा लश्कर, खानापूर, टेंभा,शिंदी, रेवसा, , चांदूर बाजार , सालोरा, पांढरी या गावातील रुग्णांनी सहभाग घेतला. या शिबिराचे आयोजन माजी जि. प. सदस्य प्रकाश साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी गजाननराव सोळंके, गोवर्धन आमझरे , उमेश हाते अविनाश बोबडे, सुनील पचारे, शामराव उमाळे ही प्रमुख मंडळी उपस्थित होती.


आरोग्य शिबिर यशस्वी होण्याकरिता युवा कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अक्षय साबळे यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post