विभागीय शिकाई मार्शल आर्ट शालेय क्रीडा स्पर्धा मध्ये आष्टी तालुक्यातील पाच विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी...




वर्धा जिल्हा प्रतिनिधी मंगला भोगे 


आष्टी : क्रीडा व युवक सेवासंचालनालंय,महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा द्वारा आयोजित विभागीय शिकाई मार्शल आर्ट क्रीडा स्पर्धा ही तालुका क्रीडा संकुल वर्धा येथे घेण्यात आली होती उपस्थित प्रमुख पाहुणे क्रीडा अधिकारी खोब्रागडे , शिकाई मार्शल आर्ट असोशियशन ऑफ इंडिया चे अध्यक्ष मझहर खान,सचिव रविंद्र गायकी क्रीडा स्पर्ध्येचे आयोजक निलेश राऊत यांच्या निगराणीत ही स्पर्धा पार पडली . या स्पर्ध्ये मध्ये आष्टी तालुक्यातील पाच विद्यार्थी यशस्वी ठरले..



प्रांजली रा.कौराईक ज्ञानेश्वरी ज्युनियर कॉलेज साहूर व गायत्री ना. अम्बुडारे हुतात्मा राष्ट्रीय विद्यालय साहूरच्या विद्यार्थिनीने गोल्ड मेडल पटकावून राज्य स्तरावर मुंबई येथ्ये निवड झाली आहे.


      तसेच नयन गोवर्धन नेहारे संत भाकरे महाराज विद्यालय सुसुंद्रा ,हर्ष जि.गुजर ,शास्वत रु.ठाकरे हू.रा.वि.इ.मी.स्कूल आष्टी च्या विध्यार्थ्यांनी सिल्वर मेडल मिळवून आपल्या शाळेचे नाव उज्वल केले. 

   यांचे अभिनंदन करण्यास मार्शल आर्ट ट्रेनिंग स्कूल हू.रा.वि.साहूर येथ्ये फॉरेस्ट रेंजर सोन्रर यांनी विध्यार्थ्यांना फुल गुच्छे देऊन हार्दिक अभिनंदन केले.

      तसेच तालुका क्रीडा संकुल आष्टी चे क्रीडा संयोजक अमित इंगळे , मार्गदर्शक नितीन डोईफोडे , अनिल मोक्कादम , सुरेंद्र भनेरकर व कराटे प्रशिक्षक निलेश घाटवाडे यांनी सर्व विध्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या...

Post a Comment

Previous Post Next Post