सोशल मीडीयाचा गैरवापर करणे टाळा..
छ.संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी सादिक शेख
जय कालिंका देवी शिक्षण संस्था संचलित छत्रपती शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय सावळदतबारा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून एक दिवसीय कायदेविषयक शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरासाठी फरदापुर पोलीस स्टेशनचे सहा पोलीस निरीक्षक प्रफुल साबळे शिबिराचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते पिंक पथक प्रमुख पोलीस स्टेशन सिल्लोड उपविभाग पोलीस उपनिरीक्षक गजानन कौळोसे व फरदापुर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे हे प्रमुख मार्गदर्शक होते सोशल मीडिया वापर व रॅगिंग कायदा psi गजानन कौळासे बोलताना सांगितले, की विद्यार्थ्यांनी शालेय जीवन जगत असताना कोणत्याही विद्यार्थ्याला व विद्यार्थिनीला आपल्या बोलण्यातून किंवा कृतीतून कोणत्याही प्रकारचा मानसिक व शारीरिक त्रास होणार नाही याची प्रत्येकाने खबरदारी घ्यायला पाहिजेत तसेच दैनंदिन जीवनात करत असताना मोबाईलचा सर्रास वापर हा जीवन आवश्यक न होता जीवनाला घातक होत आहे परिणामी पालकांना आपले मुलं गमवावे लागत आहेत अशा बातम्या आपण दररोज सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचत असतो तेव्हा प्रत्येकाने मोबाईलचा वापर केवळ आवश्यक तिथं व योग्यत्या कामासाठीच करावा कारण आपण केलेली मोबाईल वरती कोणतीही कृती ही तुम्ही डिलीट करू शकता परंतु,
सायबर कॅफेला ही सर्व माहिती आयुष्यभर सेव असते तेव्हा आपण घेत असलेली कोणती पोस्ट किंवा इतर माहिती समाज विघातक धार्मिक भावना दुखावणारी जातीय तेढ निर्माण करणारी अशी कोणतीही बातमी फॉरवर्ड व शेअर कराची नाही जेणेकरून इतरांना त्याचा कोणताही सामाजिक अथवा मानसिक त्रास होणार नाही या गोष्टीवर प्रामुख्याने प्रकाश टाकला त्यानंतर psi सुग्रीव चाटे यांनी बालविवाह बद्दल विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले असे सविस्तर मार्गदर्शन केले महाविद्यालयाचे प्राचार्य नारायण कोलते यांनी संस्थेच्या व शाळेच्या वतीने प्रफुल साबळे यांना शाल श्रीफळ व पुस्तक देऊन त्यांचा जाहीर सत्कार तसेच सोयगाव तालुक्यात आपली नवीन नेमणूक झाली.
त्याबद्दल अभिनंदन व आभार व्यक्त केले त्यानंतर सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार समारंभाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला प्रा जीवन कोलते पा यांनी संस्थेच्या वतीने प्रास्ताविक पर भाषण करून संस्थेचे व शाळेची सर्व माहिती मान्यवरांना सांगितली सूत्रसंचालन करून आलेल्या सर्वांना सोशल मीडियाचा वापर व गैरवापर तसेच महिला सबलीकरण याबद्दल सविस्तर मार्गदर्शन सुद्धा केले आलेल्या सर्व पाहुण्यांचे विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये सर्व प्रमुख पाहुण्यांचे पत्रकार बंधूंचे स्वागत केले व संस्थेतील सर्व पदाधिकारी सर्व विद्यार्थी व गावातील पालक मान्यवर उपस्थित होते शाळेतील शिक्षकसर्व शिक्षक सर्व विद्यार्थी प्राध्यापक व शिक्षक उपस्थित होते तर सर्व विद्यार्थी व पालक सर्व पालकांचे शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे आभार प्रा प्रविण सरकटे पा.यांनी मानले.