ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र पहिली राज्यस्तरीय रक्तदान जनजागृती काव्यवाचन स्पर्धेत सुरेश कांदळगावकर यांच्या कवितेला प्रथम क्रमांक

 




डोंबिवली(गुरुनाथ तिरपणकर)-ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र रक्तदान क्षेत्रात ७व्या वर्षात पदार्पण करत असताना रक्तदान शिबिराबरोबर पहिली राज्यस्तरीय रक्तदान जनजागृती ऑनलाईन काव्यवाचन स्पर्धा आयोजित केली होती.महाराष्ट्रातुन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या स्पर्धेत सुरेश कांदळगावकर(श्री रामवाडी,वेंगुर्ले)यांच्या"एकदा तरी रकात दान कर" या मालवणी कवितेला प्रथम मिळाला.चिदानंद रक्तपेढी, शास्री नगर शासकीय हाॅस्पिटल डोंबिवली वेस्ट येथे आयोजित पारितोषक वितरण समारंभात सुरेश कांदळगावकर यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र,रोख रक्कम,मेडल अशा स्वरुपात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक समारंभपुर्वक प्रदान करण्यात आले.सुरेश कांदळगावकर यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post