कामगार भजन स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ थाटात संपन्न
{पंजाबराव देशमुख}
गुरुकुंज/ मोझरी/अमरावती : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळा करवी पुरुष 28 वी तर महिला 18 वी राज्यस्तरीय कामगार भजन स्पर्धेचे आयोजन राष्ट्र संत तुकडोजी महाराज श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम येथे आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत पुरुष गटात कोल्हापूर तर महिला गटात नागपूर संघ प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत या विजयी संघाना राज्यस्तरीय पुरस्कार व रोख रक्कम देऊन त्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला आहे तसेच राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सागता झाली.
या राज्यस्तरीय कामगार भजन स्पर्धा दि.29 व 30 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या संपूर्ण राज्यातून पुरुष व महिला एकूण 35 संघ सहभागी होऊन त्यामध्ये एकूण 420 भजन कलावंतानी आपला कलाविष्कार प्रगट केला तर आपल्या भजन साधनेने भजन रसिकांची मने जिकंली. या कामगार राज्यस्तरीय स्पर्धेचा बक्षिस समारंभ मोठया थाटाने आज अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम,( मोझरी) येथे पार पडला.
या स्पर्धेत पुरुष गटात व्दितीय नायगांव गट तृतीय वरळी गट उत्तेजनार्थ प्रथम अमरावती गट व्दितीय सोलापूर गट तर उत्कृष्ट तबला-पखवाजक वादक प्रथम ज्ञानेश वगेळी ,कोल्हापूर गट व्दितीय मिलाजी पुणेकर, नागपूर गट तृतीय सुजल काडवे, नांयगाव गट उत्कृष्ट गायक प्रथम कृष्णा काडवे, नायगांव गट व्दितीय प्रमोद पोकळे, नायगांव गट तृतीय शत्रुघ्न आढाव, अकोला गट उत्कृष्ट पेटीवादक प्रथम प्रशांत घाडी, वरळी गट व्दितीय प्रविण कुरळकर, पुणे गट तृतीय चैतन्य कडस्कर, नागपूर गट , उत्कृष्ट तालसंच प्रथम नाशिक गट व्दितीय संभाजीनगर गट तृतीय नागपूर गट तर महिला गटात व्दितीय संभाजीनगर गट तृतीय चिपळूण गट उत्तेजनार्थ प्रथम ठाणे गट व्दितीय नांदेड गट तर उत्कृष्ट तबला-पखवाजक वादक प्रथम विजया इंगोले, संभाजी नगर गट व्दितीय भाग्यश्री शिंदे, वरळी गट उत्कृष्ट गायक प्रथम रश्मी कविश्वर, नागपूर गट व्दितीय लक्ष्मी थोरात, संभाजीनगर गट तृतीय शितल भोसले, ठाणे गट उत्कृष्ट पेटीवादक प्रथम भारती पाळेकर, चिपळूण गट व्दितीय जयश्री खतकर, ठाणे गट तृतीय स्वाती पंडित, सांगली गट, उत्कृष्ट तालसंच प्रथम सांगली गट व्दितीय नागपूर गट तृतीय ठाणे गट भजनी संघ कलावंताना पुरस्कार,प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या राज्यस्तरीय कामगार भजन स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी जनार्दन बोथे सरचिटणीस,अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज ,प्रमुख पाहुणे अमोल बांबल अधिक्षक श्री गुरुदेव मानवसेवा छात्रालय तसेच विशेष उपस्थिती म्हणून राज्याचे कल्याण आयुक्त रविराज इळवे, नागपूर व अकोला विभागाचे सहायक कल्याण आयुक्त नंदलाल राठोड आणि स्पर्धेचे तज्ञ परिक्षक नारायण दरेकर, किशोर अगडे, डॉ.मुक्ता महल्ले (धांडे) हे मान्यवर मंचावर उपस्थित होते. हया मंडळाच्या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंकज देशमुख अध्यक्ष जिल्हा कॉग्रस सेल,निलेश भिवगडे डेकोरेटर, हेमत भोंगाडे ध्वनीक्षेपण व्यवस्थापना,शाम काळकर तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज याची मनमोहक प्रतिमा रांगोळीच्या माध्यमातून साकारणारे कलावंत अमोल ठाकरे यांचे स्वागत कल्याण आयुक्त् इळवे यांच्या हस्ते करण्यात आले या दोन दिवसीय राज्यस्तरीय कामगार भजन स्पर्धेने श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रमाची पावनभूमी भक्ती गायनाच्या सूरानी न्हाहून निघाली. या राज्यस्तरीय कामगार भजन स्पर्धेचे परिक्षण सन्माननिय परिक्षक नारायण दरेकर, किशोर अगडे, डॉ.मुक्ता महल्ले (धांडे) यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्याचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमरावती गटाच्या कामगार कल्याण अधिकारी प्रतिभा भाकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सहायक कल्याण आयुक्त नंदलाल राठोड यांनी केले सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अकोला गटाच्या कामगार कल्याण अधिकारी वैशाली नवघरे,जळगाव खान्देश गटाचे कामगार कल्याण अधिकारी सत्यजित चौधरी व नागपूर गटाचे कामगार कल्याण अधिकारी छोटु जाधव,नागपूर विभागाचे निधी निरीक्षक राजेश पाठराबे, अमरावती येथील केंद्र संचालक सचिन खारोडे,कल्याण निरीक्षक प्रतिभा पागधुने तसेच मंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिक्षम घेतले.