गावाकडची बातमी प्रतिनिधी अक्षय मनवर मो.+91 73509 11385
संपूर्ण देशात ई व्ही. एम. मशीन चा वापर निवडणुकामध्ये करण्यात येवू नये याकरिता द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या वतीने मा. राष्ट्रपती, मा. प्रधानमंत्री, मा. सुप्रीम कोर्ट मुख्य न्यायाधीश तथा निवडणूक आयोग यांना दिनांक 29 जानेवारी रोजी निवेदन देण्यात आले.
त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा धारणीच्या वतीने निवडणुकांमध्ये ईव्हीएम चा वापर बंद करण्यात यावा याकरिता भारताच्या राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू यांना उपविभागीय अधिकारी धारणी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. सदर निवेदनाची प्रत भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश तथा इलेक्शन कमिशन यांना सुद्धा उपविभागीय अधिकारी धारणी यांच्यामार्फत देण्यात आली.सदर निवेदन देण्याकरिता भारतीय बौद्ध महासभा शाखा धारणी तसेच समता सैनिक दल धारणीचे पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी तहसीलदार तथा प्रभारी उपविभागीय अधिकारी शेवाळे यांना हे निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा धारणी चे अध्यक्ष राजकुमार खंडारे, उपाध्यक्ष गजानन सुखदेव,जिल्हा संरक्षण सचिव ललित कांबळे, उपाध्यक्ष अनिल तायडे, धर्मपालजी चतुर, विजय मोटघरे, बाबाराव दाहीजे, गजानन खरात,सुभाष विरघट, प्रकाश थोरात, बबीताताई खरात, सुभाषजी गायकवाड, गजानन थोरात, राहुल वानखडे भारतीताई शेंडे, बबिता गायकवाड,कीर्तिताई कांबळे, समता सैनिक दलाचे राहुल खंडेरावं,आकाश वानखडे, रोहीत खंडेराव,अनिकेत सदार, सुमेध खरात,आकाश सदार,उपस्थित होते.