धनवटे नॅशनल कॉलेज नागपूर मराठी विभाग व जीवन गौरव साहित्य परिवार महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जीवन गौरव साहित्यधारा साहित्य सोहळा नागपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
सदर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू शरदचंद्र निंबाळकर यांनी भुषविले खऱ्या अर्थाने नव साहित्यिकांनी सामाजिक भान ठेवून दर्जेदार साहित्य निर्माण करावे असे आवाहन केले तर उद्घाटक माजी आमदार वामनराव चटप वरोरा यांनी संत साहित्याचे विवेचन केले.त्यांना जीवन गौरव साहित्य पुरस्काराने गौरविण्यात आले.
अतिथी म्हणून जेष्ठ चित्रकार प्रदीप पवार,कल्याणी मादसवार यवतमाळ, शब्दांकूर फाउंडेशनचे अध्यक्ष तथा जीवन गौरव मासिक चे सहसंपादक दुषांत निमकर, चंद्रपूर तसेच स्वागताध्यक्षा डॉ भारती खोपकर ह्या होत्या. सोहळ्याची सुरूवात विवेकसिंधु, लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी,तुकाराम गाथा, ग्रामगीता या ग्रंथाची पुष्पपुजा करुन झाली.
याप्रसंगी नव साहित्यिकांच्या विविधांगी लेखनाचा विचार लक्षात घेऊन साहित्य लेखन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
त्यात नांदेड जिल्ह्यातून कवी खंदारे सुर्यभान गुणाजी, प्रल्हाद हरिणखेडे,मुंबई, विजेता चन्नेकर गोंदिया, रविंद्र गिमोणकर नागपूर,उमेंद्र बिसेन पुणे,यांचा समावेश आहे.
समारोपप्रसंगी साहित्यिकाने वास्तविक घटनांवर विचार विनिमय करून समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य करावे असे आवाहन दैनिक लोकशाहीचे संपादक भास्कर लोंढे यांनी केले व साहित्य संमेलनाचा समारोप केला.