गणोजा देवी गावामध्ये अवैध धंदे दारु व वरली मोठ्या प्रमाणात

 




अवैध धंदे व्यवसायीकांना पोलीस कर्मचारी सागर चव्हाण यांचे पाठबळ

  



भीम ब्रिगेड संघटनेची कारवाईची मागणी



भिम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने आपल्या निदर्शनात आणुन देऊ इच्छितो की, गणोजा देवी भातकुली तालुका येथील सर्व रहीवासी आहोत. आमच्या गावामध्ये गावातील काही गुंड प्रवृत्तीचे अवैध घंदे करणारे व्यवसायीक नामे राजिक शाह, भुन्या खंडारे, रवि वानखडे, भाऊराव खडसे, साहेबराव वानखडे यांच्यामुळे गावातील न्याय व्यवस्था भंग पावली आहेत. यांच्या दहशतीमुळे गावातील महिला, तरुण मुली, विद्यार्थीनी व युवा वर्गाला अतोनात मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या गुंडाच्या दहशतीमुळेच गावातील शांतता भंग सुध्दा होत आहे. या अवैध धंदे करणान्या गुंडाना आपल्या विभागाचा पोलीस कर्मचारी सागर चव्हाण याचे मोठे पाठबळ लाभले असून त्याच्या पाठबळामुळे दारु व्यवसाय सेलीग मध्ये जे कुरुम या गावातील देशी दारुचे दुकान आहे त्या दुकानामधून दारु ही सेलोग होते त्यामध्ये वरिल व्यवसायीक मुन्या व राजीक व सागर चव्हाण पोलीस कर्मचारी यांची भागीदारी असुन संपूर्ण गणोजा देवी तालुक्यामध्ये दारु पुरवठ्याचे काम मोठ्या युध्द पातळीवर करुन छोटया मोठया अवैध व्यवसायीकांना दारुच्या पेटया पुरवठा करीत असून संपूर्ण तरुण युवा पिढी व काही संसार यांच्यामुळे उध्दवस्त झाले आहे.



सदर काही दिवस अगोदरच गावामध्ये एका तरुण युवकाने दारुच्या आहारी गेल्यामुळे त्याने फाशी घेतली आहे व त्यामुळे त्याचा संसार उध्दवस्त झाला आहे. काही दिवस अगोदर सदर गावामध्ये 03/2/202३ ला तंटा मुक्ती व ग्रामपंचायत मिळून वराव पास करुन निवेदन देण्यात आले होते परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही, करीता सदर गावातील दारु येत्या ७ दिवसाच्या आत बंद न झाल्यास व सागर चव्हाण (रायटर) यांच्यावर तात्काळ कार्यवाही न झाल्यास गणोजा देवी येथील संपूर्ण ग्रामस्थ, महिला मंडळ व तरुण युवा वर्ग यांच्या सहकार्याने आपल्या कार्यालया समोर भिम ब्रिगेड तर्फे तिव्र आंदोलन करण्यात येईल.ईशारा भीम ब्रिगेड संघटनेकडून निवेदनाद्वारे देण्यात आला आहे..

Post a Comment

Previous Post Next Post