कर्जत(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)
क्षण कृतज्ञतेचा,क्षण आनंदाचा, क्षण एक मैत्रिचा, जुन्या आठवणींना पुन्हा जागवुया ! चला मग मित्र-मैत्रिणींच्या गलक्यात पुन्हा हरवुया!याच उद्देशाने कणकवली येथील एस्.एम्. हायस्कुलच्या दहावीच्या १९७६च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळा(गेट टु गेदर)कर्जत तालुक्यातील जामरुंग या गावातील डोंगर पायथ्याशी असलेल्या'सह्याद्री हिल्स रीसाॅर्टवर, आयोजित करण्यात आला होता.मित्रांचे आपल्या जीवनात काय महत्व आहे आणि बालपणीचे मित्र एकत्रित आल्यानंतर कोणती नवऊर्जा देऊन जातात व नवचैतन्याचा अविष्कार कसा होतो याचा प्रत्यय एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणींना झाला.
मित्र हे आजच्या धकाधकीच्या जीवनात एक समाधानकारक सहवास देण्याची संधी उपलब्ध करून देतात,तेव्हा म्हणावस वाटत " दोस्ती खून से भी काफी गहरी होती है" याप्रसंगी जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.अशोक चिंदरकर यांनी आपल्या शालेय जीवनातील व आयुष्यातील घडामोडींचा अनुभव सर्वांसमोर मांडला.तसेच उन्मेश शिर्के,भरत तोरसकर यांनी मजेशीर कीस्से सांगितले.आता सर्वच मित्र-मैत्रिणींनी वयाची ६२ठी ओलंडली आहे, त्यामुळे काहींना थोड्याफार प्रमाणात अल्पशा का होईनात शारीरीक तक्रारी आहेत, या कशा दुर होतील या दृष्टिकोनातून डाॅ.सुनिता शेख यांनी फिटनेस करता शारीरिकदृष्या काही टिप्स दिल्या.
काॅमिडी कींग मंगेश चिंदरकर याने थट्टा-मस्करीतुन काही कीस्से सादर करुन कार्यक्रमात रंगत आणली. म्युझिक सिस्टीम वरून सादर करण्यात आलेल्या गाण्यांच्या तालावर सर्वांनी नाचण्याचा आनंद घेतला.तसेच सौ.गोखले मॅडम यांनी चांद्रयान व श्रीरामवर कविता सादर करुन सुखद धक्का दिला.या गेट टु गेदर साठी कणकवली,महाड,देवरुख,रत्नागिरी,चिपळूण ठाणे, बोरीवली, जोगश्वरी, मिरा रोड,कळवा, डोंबिवली,कल्याण,बदलापूर येथून माजी विद्यार्थी आले होते.शेवटी प्रसाद देसाई यांनी स्वतःकडुन प्रेमाची भेट म्हणून गावकडील काजूगर दिले. स्नेह मेळा यशस्वी करण्यासाठी संजय पाध्ये व नंदु आळवे यांनी विशेष परिश्रम घेतले.