मनविसे जिल्हाध्यक्ष अनिल हमदापुरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन केला पक्ष प्रवेश
श्रीकांत राऊत यवतमाळ:लोकसभा,विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये युवकांचा प्रवेश घेण्याचा धडाका सद्या जिल्ह्यात सुरू असुन मनविसे जिल्हाध्यक्ष अनिल हमदापुरे यांच्या वाढदिवसानिमित्त लकी छांगाणी यांनी आपल्या मित्र परिवारासह मनसेमध्ये जाहीर प्रवेश घेतला. यवतमाळ शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे ,युवा वर्गात सुपरीचीत लकी छांगाणी यांनी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे, युवा हृदयसम्राट अमित साहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होत मनविसे चे जिल्हाध्यक्ष अनिल हमदापुरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करत येणाऱ्या काळात महाराष्ट्राला मनसे शिवाय पर्याय नाही हा विश्वास व्यक्त करत शहरातील प्रसिद्ध उद्योजक ,व्यापारी, प्राध्यापक व आपल्या सर्व समर्थकासह मनसेत प्रवेश करण्यात आला. या प्रवेशानंतर यवतमाळ शहरासह यवतमाळ विधानसभेत नवयुवकांचा कल हा मनसेकडे राहील आणि भविष्यात यवतमाळ विधानसभेचे भवितव्य ठरवेल अशा प्रकारची प्रतिक्रिया मनविसेचे जिल्हाध्यक्ष अनिल हमदापुरे यांनी व्यक्त केली. याप्रसंगी प्रामुख्याने चेतन ठोंबरे , गौरव खिवसरा, सुदर्शन शिंदे पाटील, राहुल शर्मा ,डॉ. सागर गड्डमवार ,रोहन खंदाडे ,मयूर कारंजकर ,प्रकाश बर्डे ,विजय मिरकुटे अनिकेत मिठे , अविनाश खंदाडे,विकास श्रीवास ,धवल बिलखिया ,अमोल पोहरे, हर्ष भुतडा ,अनिल चुरा ,देवाशीष शर्मा ,जय चौधरी, यश कट्यारमल, अमोल ठाकरे ,राहुल मोहता ,महेश डोळसे, यासह शहरातील युवा वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. याप्रसंगी प्रामुख्याने मनसेचे दीपक आडे, गौरव दरणे ,ओम राठोड, आक्रोश पवार, सौरभ अनसिंगकर,यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .