प्रतिनिधी बालाजी शेवाळे
नांदेड : गावरान आंब्याची चवच न्यारी नैसर्गिक ( पुरानी) मोठ्याने आंब्याचे झाडे आता अवचिटच पहायला मिळत आहे.
पुर्वी मोठाल्या झाडावर लहान मुल डप्प, शिवनापाणी असे अनेकखेडळ उन्हाळ्याच्या दिवसांत खेळताना दिसत असत होते.
पण पुर्वीसारखे दिवस राहीलेले नाही.
लहान संकरित झाडांनाच आता फिर लागलेली दिसून येत आहेत.
यावर्षी आंब्याच्या झाडांना मोठ्या प्रमाणात बहार आलेला दिसून येत असून, त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात आंबा उपलब्ध होवून सामान्य ग्राहकांच्या खिशाला अधिक झळ न बसता आंब्याची चव चाखता येणार असल्याचे चित्र दिसत आहे.
अलिकडे आंब्याच्या बागा (आमराई) कमी प्रमाणात दिसत असल्या तरी शेतकरी शेतात बांधावर, घरापुढे केशर , लंगडा, हापूस रत्ना , सदाबहार आदी सुधारीत जातींची झाडे लावून जोपासत आहेत.
नवीन सुधारीत वाण लवकर व भरपूर प्रमाणात फळे देतात.
पुर्वीच्या झाडांची उंची व्यास खूपच जास्त असायचा. त्यामुळे शेतात जागा खूप लागत असे. आता सुधारित वाणांमुळे कमी जागेत अधिक झाडे असतात आणि पुर्वीपेक्षा अधिक फळे देताना दिसत आहेत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत गेल्या वर्षी वेळेत कमी पाऊस पडला. दिवाळीनंतर वातावरण पोषक असल्यामुळे यंदा सर्वत्र आंब्याची झाडे बहरलेली दिसत आहेत. यानंतर या फळांना हवामान बदलाचा परिणाम कमी-अधिक होतो.
यासाठी आवश्यक किटकनाशक, बुरशीनाशक वापरणे गरजेचे आहे. यामध्ये तुडतुडे, पिढ्या ढेकूण, भुरीरोगास बळी पडण्याची शक्यता असते.
तसेच गारपीट जोराचा वारा यामुळे फळं गळती होण्याची शक्यता आहे.
यातून बागा वाचून आंब्याची मधुरता सर्वांना मिळेल अशी अपेक्षा आहे...