शिवसेना(उबाठा) महिला आघाडी तालुकाप्रमुखपदी उज्ज्वला ठाकरे यांची निवड

 




श्रीकांत राऊत यवतमाळ 

महागाव:

शिवसेना(उबाठा) महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख पदी सौ.उज्ज्वला शंकर ठाकरे यांची निवड जिल्हाप्रमुख प्रविण शिंदे यांनी नियुक्तीपत्र देवुन केली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शिवसेनेने पक्ष संघटन बांधणीवर लक्ष केंद्रित केले असुन महागाव महिला आघाडी तालुका प्रमुख पदी सौ उज्ज्वला शंकर ठाकरे यांची निवड करण्यात आली.यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख प्रविण पांडे यांनी ठाकरे यांना नियुक्ती पत्र दिले याप्रसंगी शिवसेना नेते प्राचार्य मोहन मोरे, माजी उपजिल्हा प्रमुख सुदाम खंदारे,तालुका प्रमुख उप नगराध्यक्ष प्रमोद भरवाडे,युवासेना जिल्हा प्रमुख आरोग्य सभापती विशाल पांडे,तालुका संघटक रविंद्र भारती,युवती सेना तालुका प्रमुख सौ.मंजुषा वानखेडे,सौ.अनिता डोंगरदिवे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post