जळगाव विशेष प्रतिनिधी गणेश पाटील
जळगाव : जिल्ह्यातील देऊळगाव गुजरी व तोरणाळा येथील पत्रकार कृष्णा पाटील व संजय जटाळे यांना जागो ग्रहाक जागो कार्यालय वानखेडे नगर हडको काॅनर छत्रपती संभाजी नगर येथे दि.१६/२/२०२४ शुक्रवार रोजी केंद्रीय ग्राहक संरक्षण समिती वर ग्राहकांच्या हक्का विषयी असलेल्या आपल्या तळमळीला पाहून व समाजात आपले कार्य जनहित समर्पित नेहमी तत्पर असल्याची दखल घेवून आपल्या हातून ग्राहकांचे कल्याण घडो या भावनेने व अपेक्षेने आपणास ग्राहक संरक्षण पथकाच्या खान्देश विभाग कार्यध्यक्ष रहीम पठाण यांच्या शिफारशीने जळगाव जिल्ह्यातील देऊळगाव गुजरी येथील संजय जटाळे यांना जिल्हा उपाध्यक्षपदी तर तोरणाळा येथील कृष्णा पाटील यांना पथकाच्या जामनेर तालुका अध्यक्ष पदी ऍड मिर्झा जावेद एन.बेग केंद्रीय संरक्षण समितीचे अध्यक्ष, अनवर अली व अमोल सर यांच्या हस्ते निवड करुन त्यांना नियुक्ती पत्र देऊन गौरविण्यात आले उपस्थित मान्यवरांनी पत्रकार संजय जटाळे व कृष्णा पाटील यांच्यावर राजमल चव्हाण, डॉ. जितेंद्र राजपूत, माजी सरपंच युवराजसिंग पाटील, सुभान तडवी, गजानन लोथे शिक्षक, संतोष गणेश तेली तसेच अनेक सहकारी मित्रांनी शुभेच्छांचा वर्षाव केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या..