यूट्यूबर तसेच कलाकार विजय खंडारे यांचे दोघांनी मानले आभार
काळा गोटा या दुर्गम गावांमधील राज भोसले व सारवाडी येथील बेडा वरचा धीरज पवार यांना चित्रपटात मिळाली संधी
सुप्रसिद्ध, दिग्दर्शक तसेच निर्माते नागराज पोपटराव मंजुळे यांच्या बहुचर्चित मराठी चित्रपटात विदर्भातील दोन नवयुवक यांना चित्रपटात कलाकार म्हणून संधी मिळाली.
मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शक चित्रपट निर्माते नागराज पोपटराव मंजुळे दिग्दर्शित मराठी चित्रपट खाशाबा या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण महाराष्ट्रात सुरू आहे.
खाशाबा ह्या चित्रपटात कलाकार म्हणून विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मार्डा या गावानजीक काळा गोटा येथील अहिंद्र चर्जन भोसले यांचा पुत्र राज अहिंद्र भोसले व तसेच वर्धा जिल्ह्यातील कारंजा गाडगे नजिक असलेले सारवाडी येथील धर्मेंद्र रमेश पवार यांचा पुत्र धीरज धर्मेंद्र पवार या दोघांना चित्रपटांमधे कलाकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
राज भोसले ला चित्रपटात काम करण्याची आवड आहे. पण काही कारणांमुळे त्यास योग्य व्यासपीठ मिळू शकले नाही. पण त्याने आपले काम सोडले नाही. त्यांने मोबाईल वर व्हिडिओ बनवणे सुरू केले. त्याला हळू हळू लोकांचे त्याच्या कलेची दखल घेऊन लोकांनी त्याला योग्य तो प्रतिसाद ही दिला.
तिथून त्याचा पुढील प्रवास सुरू झाला.
गेल्या काही दिवसा आधी दाक्षिणात्य प्रंचंड गाजलेला पुष्पा या चित्रपटातील श्रीवल्ली या गाण्याचे युट्यूब वर गाजलेले मराठी भाषांतरीत तुझी झलक वेगळी श्रीवल्ली या गाण्याचे गायक विजय नारायण खंडारे यांनी राज भोसले यास संपर्क साधून खाशाबा चित्रपटाचे चित्रीकरण चालू असल्याचे सांगून त्या दोघांना तिथे जाण्यास लावले.
तिथे जाऊन ते दोघेही चित्रीकरण चालू असलेल्या स्थळावर भेट दिली होती. व तिथे दोघे ही हलगी च्या तालावर नाचू लागले. तेव्हा दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे लक्ष त्या दोघांवर गेले असता त्यांना जवळ बोलावले तिथून त्यांनी त्यांचे परीक्षण घेतले नंतर पुढील प्रक्रिया सुरू झाली. अश्या प्रकारची राज भोसले यांनी माहिती दिली.
भविष्यात त्याला भारतीय हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीत नाव कमावणे व मोठा कलाकार होणे हे त्याचे स्वप्न आहे असे सांगत राज भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
व येत असलेला मराठी चित्रपट खाशाबा हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपट गृहात जाऊन संपूर्ण महाराष्ट्र वासियांनी बघावा असे आवाहन राज भोसले व धीरज पवार यांनी केले आहे.